कुंभारीनजिक अपघातात एकजण ठार

0
जत : विजापूर-गुहाघर मार्गावर कुंभारीनजिक मालवाहतूक वाहन व मोटारसायकलच्या अपघातात एका परप्रांतीय मजूराचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे.लालचंद रामशरण मोरया (वय ३२,रा.सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश) असे मयत मजूराचे नाव आहे तर दुर्गेश मोरया (वय २० रा.मेदवाल,जि.संतकबीर,उत्तरप्रदेश) असे जखमी मजूराचे नाव आहे.रवीवारी सायकांळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला.

 

 

अधिक माहिती,उत्तरप्रदेश येथील हे दोघे मजूर सध्या जत येथे राहून गंवडीकाम करत होते.रविवारी त्याचे कुंभारी येथे काम सुरू होते.काम संपवून ते दुचाकीवरून जतकडे येत असताना मालवाहतूक वाहन व दुचाकीची धडक झाली त्यात लालचंद मोरया जागीच ठार झाला तर दुर्गेश मोरया जखमी झाला आहे.त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू आहे. जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.