कॉग्रेसचे संख येथे चक्री आंदोलन सुरू

0
जत : जत तालुका काँग्रेस कमिटीचा वतीने दि. २४, २५, २६ जुलै २०२३ रोजी विविध मागण्यासाठी चक्री आंदोलन करण्यात शुरू करण्यात आले आहे.सोमवारी संख येथून या चक्री आंदोलनास सुरूवात झाली आहे.आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहिर करावा म्हणून सरकारला जागे करण्यासाठी आंदोलनांची तीव्रता वाढविण्यात येत आहे.जत तालुका दुष्काळ जाहीर करावा.पिण्याच्या पाण्याचे टँकर त्वरीत सुरू करावेत.जनावरांचा चारा त्वरित उपलब्ध करून द्यावा.म्हैशाळ योजनेचे आवर्तन सुरू करावे.विस्तारीत म्हैशाळ योजनेचे काम त्वरित सुरू करावे.महाराष्ट्र कर्नाटक करार करून जत पूर्व भागास तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी द्यावे,महावितरणच्या उपकेंद्राची संख्या वाढवावी.त्यासाठी निधी मंजूर करावा.जत तालुक्याचे त्रिभाजन त्वरीत करावे.महाराष्ट्र शासनास हे काही होणार नसेल तर आम्हास कर्नाटक मध्ये जाण्यास परवानगी द्यावी.अशा मागण्या या आंदोलनांच्या माध्यमातून सरकारकडे करणार आहेत.

 

 

जत पूर्व भागातील शेतकरी आणि जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संख अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर हे चक्री आंदोलन सुरू झाले आहे.सोमवार पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव आणि पदाधिकारी यांनी आंदोलनास उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला.यावेळी आप्पाराया बिरादार,बाबासाहेब कोडग, सरदार पाटील, सुजय नाना शिंदे, महादेव पाटील,युवराज निकम, जालिंदर  व्हनमाने, पिराप्पा माळी ,गणी मुल्ला , भूपेंद्र कांबळे ,अनिल पाटील , भारत सुर्यवंशी ,शिवानंद बिरादार,मारुती पवार सलीम पछापुरे,महादेव कोळी,अशोक बन्नेनवर, बिराप्पा शिंदे, बाबासाहेब माळी, हिंदुराव शेंडगे, यांच्यासह दरीबडची,दरिकोनुर,आसंगी,संख,तिल्याळ, करेवाडी,को बोबलाद, तिकोंडी गोंधळेवाडी, सिध्दनाथ, मोटेवाडी खंडनाळ,पांडोझरी धुळकरवाडी, कागनरी, जालीहाळ, कोणबगी आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.