जत : शिक्षक बँकेचे चेअरमन मा. विनायक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या शिक्षक बँकेच्या कारभाराला या जुलै महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले आहे.एक वर्षात शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे आणि सत्ताधारी संचालक मंडळाने सभासद हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत, असे मत शिक्षक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष बसवराज येलगार यांनी व्यक्त केले.सोळा लाख कर्जला एक अंकी व्याजदर, नाममात्र रकमेत राजीनामा दिलेल्या सभासदांना पुन्हा सभासद करून घेणे,कर्जाचे व्याजादर कमी करून ठेवीचे व्याजदर वाढवणे,बँकेचा वाढलेला एन पी ए कमी करणे, ठेवीचे प्रमाण वाढले आहे.
कर्ज वाटपाचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.सभासदासाठी ऑनलाईन बँकिंग व्यवस्था आणि बँकिंग ऍप,बँकेच्या खर्चात काटकसर करणे असे अनेक महत्वपूर्ण निर्णय चेअरमन विनायक शिंदे आणि संचालक मंडळाने घेतले आहेत. स्वाभिमानी संचालक मंडळ सभासदांना दिलेल्या जाहीरनाम्याची, वचनपूर्तता येत्या चार वर्षात निश्चितपणे पूर्ण करेल आणि शिक्षकांची कामधेनू असलेली शिक्षक बँक, स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या काळात उंच यशाच्या शिखरावर जाईल, असा आत्मविश्वासही बसवराज येलगार यांनी व्यक्त केला.
यावेळी शिक्षक बँकेचे संचालक फत्तू नदाफ,गांधी चौगुले,जत तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप पवार, सरचिटणीस प्रकाश गुदळे, नेते जकाप्पा कोकरे, कृष्णा तेरवे,देवाप्पा करांडे,सुभाष शिंदे, सिकंदर शेख, शिवाजी महाजन, नितीन वाघमारे,विठ्ठल कोळी,भगवान नाईक आदी शिक्षक संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.