घोलेश्वरच्या डॉ.निर्मला यमगर यांचा नागरी सत्कार

0

येळवी : घोलेश्वर ता.जत येथील निर्मला महादेव यमगर यांनी (एमबीबीएस)पदवी मिळवत गावच्या पहिल्या ‌डॉक्टर होण्याचा बहुमान मिळविला आहे.डॉ.निर्मला या घोलेश्वर गावचे सुपुत्र मेजर महादेव यमगर यांच्या कन्या आहेत. त्यांनी मोठ्या परिश्रमांने ही पदवी मिळविले आहे.डॉ.निर्मला यांनी नाक,घसा आजारावर विशेष पाविण्यही मिळविले आहे.

 

 

घोलेश्वर जिल्हा परिषद शाळेत डॉ.निर्मला यमगर यांचा सत्कार जत येथील प्रसिद्ध डॉक्टर शालीवाहन पट्टणशेट्टी यांच्याहस्ते नागरी सत्कार करण्यात आला.त्यावेळी सरपंच शोभा संभाजी हेगडे,उपसरपंच गुलशन समशेर नाईक,शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ गडदे,उत्तरे सर,नाईक सर,माळी सर व सर्व सहशिक्षक, जिल्हा परिषद शाळा घोलेश्वर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमजद नदाफ,उपाध्यक्ष संतोष यमगर,ग्रामपंचायत सदस्य संभाजी यमगर,अली साहेब नाईक,रंजना गडदे,समशेर नाईक,मुबारक नाईक,माजी सरपंच गैबीसाब नदाफ, अण्णाप्पा कोडलकर,म्हातारबा चौगुले, आप्पासो समशेर नाईक,अमीनभाई नाईक, हुसेन नाईक,महंमद नाईक,अमोल हेगडे,भैयाजी हेगडे,फारूक नाईक,अशपाक नाईक दर्याप्पा यमगर, सोपान आटपाडकर,शंकर यमगर, बाळासाहेब पाटील,घोलेश्वर गावातील अन्य नेते व गावकरी मंडळी उपस्थित होते.घोलेश्वरच्या डॉ.निर्मला यमगर यांचा नागरी सत्कार करताना ‌डॉ.शालीवाहन पट्टणशेट्टी व मान्यवर
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.