अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पात निधी देताना जतला वगळले | – विक्रम ढोणे

0
जत : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्याला रस्ते व पुलासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले आहेत पण जत तालुक्याला एक रुपयाचा दमडीही मंजूर करण्यात आला नाही यामुळे जत तालुका महाराष्ट्रात आहे का नाही ? असा सवाल युवा नेते विक्रम ढोणे यांनी केला आहे.

 

 

राज्यामध्ये महविकास आघाडी अथवा महायुतीचे सरकार असो जत तालुक्यावर अन्याय ठरलेला असतो.यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि महायुतीचे सरकार आले पण जतला निधी काही मिळालेला नाही.महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मंजूर असलेल्या निधीला स्थगिती देण्यात आली होती,इतर तालुक्यातील स्थगिती उठवण्यात आली होती पण जत तालुक्यातील मंजूर निधीची स्थगिती उठवण्यात आली नाही. आणि सध्या चालू असलेल्या अधिवेशनातील पुरवणी अर्थसंकल्पातूनही जत तालुक्याला वगळ्यात आले आहे. एकही रूपयाचा निधी जतला दिला नसल्याचा आरोप ढोणे यांनी केला.

 

 

याचे श्रेय कोणाला
जत तालुक्यामध्ये म्हैशाळ योजनेचे पाणी आल्यावर आमदार, खासदार आणि अनेक पक्षाचे पदाधिकारी यांच्यात श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू आहे तर मग राज्याच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात जत तालुक्यासाठी  रस्ते आणि पुलासाठी दमडी आली नाही याचे श्रेय कुणाला असा सवाल युवा नेते विक्रम ढोणे यांनी केला आहे.
Rate Card
पालकमंत्र्यांकडून अपेक्षाभंग
पालकमंत्री सुरेश खाडे पहिल्यांदा आमदार जत विधानसभा मतदारसंघातून झाल्याने ते मंत्री, पालकमंत्री झाल्यावर जतकरांच्या अपेक्षा वाढल्या होत्या पण पुरवणी अर्थसंकल्पातून दमडीही न दिल्याने जतकरांचा पालकमंत्र्यांकडून अपेक्षाभंग झाला आहे.पालकमंत्री जिल्हाचे का फक्त मिरज मतदारसंघाचे असा सवाल विक्रम ढोणे यांनी केला.
राज्यकर्त्यांकडून दिशाभूल
जत तालुक्यात कर्नाटक जाण्याची चर्चा सुरू झाल्यावर उद्योगमंत्री उदय सामंत जत तालुक्याला भेट देऊन विकास कामांवरील स्थगिती उठवणार, एमआयडीसी साठी जागा हस्तांतरीत करणार, म्हैशाळ योजनेचे सुधारित टेंडर काढणार सांगीतले पण सुधारित कामाची अर्धवट टेंडर काढून जतच्या जनतेची दिशाभूल केली जात आहे. ना स्थगिती उठवली, ना निधी दिला फक्त वेळ मारून नेण्याचे काम केले.यामुळे जत तालुका महाराष्ट्रात आहे का नाही हे एकदा राज्यकर्त्यांनी जाहीर करण्याचे आवाहन युवा नेते विक्रम ढोणे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.