तम्मनगौडा रवीपाटील यांची भारत सरकारच्या महामंडळावर नियुक्ती | केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले पत्र 

0
जत: जत तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांच्या पक्षातील कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या महामंडळावर संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी निवडीचे पत्र दिले आहे.भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालया अंतर्गत देशातील रस्ते सुरक्षेसाठी स्वतंत्रपणे महामंडळ कार्यरत आहे. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा कौन्सिल असे या महामंडळाचे नाव आहे. या महामंडळावर केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे मुख्य सचिव, सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार, अनेक उच्च पदस्थ अधिकारी, राजकीय पदाधिकारी संचालक आहेत.
तम्मनगौडा रवीपाटील म्हणाले की, भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर तालुक्यांमध्ये मोदी @9 अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले आहे. राज्यातील पहिली वार रूम जतमध्ये सुरू करण्यात आली आहे. सरल प व नमो अँप सभासद नोंदणी मध्ये जत विधानसभा क्षेत्राचे काम पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर आहे. गावोगावी संपर्क दौरे सुरू आहेत. तालुक्यातील 124 पैकी 74 गावांमध्ये संपर्क दौरा पूर्ण झाला आहे. पक्षामध्ये वेळोवेळी केलेल्या कार्याची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपणास देशपातळीवर कामाची संधी दिली आहे. या माध्यमातून मिळालेल्या पदाला सक्षमपणे न्याय देण्याची आपली भूमिका आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.