हिम्मत असेल तर जमदाडेंनी आपला पक्ष जाहीर करावा | तम्मनगौडा रवीपाटील यांची टीका

0
जत: प्रकाश जमदाडे हे धंदेवाईक ठेकेदार आहेत. नेता कधी होऊ शकणार नाही. भाजपमध्ये नसताना त्यांनी नुसती उठाठेव करू नये.हिम्मत असेल तर त्यांनी आपला पक्ष कोणता ते जाहीर करावे, अशी टीका भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकार बैठकीत केली.

भाजपचे निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांची पदावरून हाकालपट्टी करावी या मागणीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी पुढाकार घेऊन प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली होती. त्याला रवीपाटील यांनी जोरदार उत्तर दिली.
रवीपाटील म्हणाले की, प्रकाश जमदाडे हे नेमक्या कोणत्या पक्षाचे आहेत? ते भाजपचे साधे सभासदही नाहीत.काही दिवसापूर्वी एका बाजूला जयंत पाटील व दुसऱ्या बाजूला शरद पवार यांचा फोटो लावून ते मिरवत होते.त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता.भारतीय जनता पक्षामध्ये लुडबुड करण्याचा त्यांना कोणी अधिकार दिला? पक्षात नसल्यांनी आमची बदनामी केली तर आम्ही खपवून घेणार नाही.
तम्मणगौडा रवीपाटील म्हणाले,

Rate Card
भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेरिटवर माझी विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून निवड केली आहे. राज्यातील पहिली वार रूम आपण जत विधानसभा क्षेत्रात सुरू केली आहे. सरल ॲप व नमो ॲप सभासद नोंदणीमध्ये 40 विधानसभा मतदार संघात, पश्चिम महाराष्ट्रात आपण आघाडीवर आहोत. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने आपले कौतुक केले आहे तसेच संपूर्ण ताकदीनिशी काम करण्याचा सल्ला दिला आहे.

 

सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते आमदार गोपीचंद पडळकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, लोकसभा व विधानसभा समन्वयक शेखर इनामदार, नीताताई केळकर, मिलिंद कोरे हे सर्वजण ठामपणे माझ्या पाठीशी उभे आहोत. पक्षाचे काम निष्ठेने व सक्षमपणे करावे, असा सल्ला दिला आहे.

रवीपाटील पुढे म्हणाले,माझ्या विरोधात तक्रार करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे गेलेले प्रकाश जमदाडे,मंगल जमदाडे, मोहन कुलकर्णी हे राष्ट्रवादीमध्ये आहेत. तर दिग्विजय चव्हाण, रवींद्र सावंत हे काँग्रेसचे आहेत. दुसऱ्या पक्षात असलेले लोक भाजपच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करतात. हे अत्यंत हस्यास्पद आहे. प्रकाश जमदाडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता किंमत नाही व भाजपमध्येही किंमत नाही. जिल्हा बँकेत त्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी‌ झाली आहे.पक्षात नसताना माझ्या हकालपट्टीची मागणी म्हणजे आपण ज्या कुटुंबाचे सदस्यच नाही त्या कुटुंबाच्या संपत्तीत वाटा मागण्याचा हा प्रकार आहे. जमदाडे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आपला पक्ष जाहीर करावा, असेही रवीपाटील म्हणाले.विलासराव जगताप यांच्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रवीपाटील म्हणाले की, माजी आमदार जगताप हे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा मानसन्मान करतो. वडीलकीच्या अधिकाराने ते काही बोलले असतील.त्यांच्याविषयी आपणास आदर आहे,असेही रवीपाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.