जत : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांच्या रुपातील गणेश मुर्ती बनविणे व बसविण्यास प्रतिबंध करावा,अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडकडून तालुका प्रशासनाला देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहेत.त्यांनी आपल्या स्वाभिमानाने स्वराज्य निर्माण केले.काही मूर्तिकार छत्रपती शिवाजी महाराजांची गणेश स्वरूपातील मूर्ती तयार करत आहेत.पण त्यानंतर ती मूर्ती विराजमान केल्यानंतर काही दिवसानंतर प्रतीकात्मक स्वरूपातील मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते,याचाच अर्थ आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो, महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सर्व जगभर ज्ञात आहे.
परंतु महाराजांच्या रूपात गणेश मूर्ती तयार करून नंतर नदीमध्ये विहिरीमध्ये इतर ठिकाणी विसर्जित होण्याची शक्यता आहे. हा एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान, अपमान आहे, सदरचा प्रकार संताप जनक आहे. ज्या महापुरुषांनी आपले पराक्रमाने स्वराज्य निर्माण केले आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी महाराजांच्या रूपातील मूर्ती नदीमध्ये विहिरीमध्ये इतर ठिकाणी बुडवणे हा अपमान होणार आहे,त्यामुळे सर्वच महापुरुष असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपातील गणेश मूर्ती तयार करण्यात येऊ नयेत तसेच विक्रीस ठेवू नये, किंवा मूर्तीकरांनी मूर्ती तयार करू नये व प्रदर्शनासही ठेवू,अथवा गणेश मंडळांनी बसवू नयेत,असे आवाहनही संभाजी बिग्रेडकडून करण्यात आले आहे.
याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी जत अजयकुमार नस्टे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्रेयश नाईक,तालुका उपाध्यक्ष रोहित चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष इर्षाद तांबोळी, जत शहराध्यक्ष प्रमोद काटे,आकाश जाधव,सुरेश पाटील यांनी दिले आहे.