बार्शी : पत्नीवरील चारिञ्याच्या संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना जामगाव (ता. बार्शी) येथे उघडीस आली आहे.ही घटना शनिवारी (ता.२) घडली असून बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसाकडून कसून चौकशी सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.आत्महत्या केलेला संशयित आरोपी धनाजी संभाजी गायकवाड (वय ४५, रा. जामगाव आ) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.गंगाबाई धनाजी गायकवाड (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. बालाजी कागदे यांनी फिर्याद दाखल केली.
ही घटना जामगाव येथे शनिवारी सायंकाळी सहापूर्वी घडली.डोक्यामध्ये बत्ता घालून पत्नी गंगाबाई हिचा खून करून पती धनाजी गायकवाड याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत.पुढील तपास बार्शी पोलीसाकडून सुरू आहे.