जत : बाज (ता. जत) येथे उसात लागवड केलेल्या गांजा शेतीवर छापा टाकून सुमारे सुमारे १९ किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत १ लाख ९१ हजार होते. हा छापा सोमवारी सायंकाळी टाकण्यात आला.याप्रकरणी संशयित बापू पांडुरंग खरात(वय ५२) याला अटक करण्यात आले.
रात्री उशिराने जत पोलिसात गुन्हा झाला आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांना बाज येथे ऊस शेतात गांजा लागवड केल्याची माहिती मिळाली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घुगे, पोलिस नाईक सुनील व्हनखडे, विजय अकुल यांनी केली.
जत: बाज येथे शेतात छापा टाकून सुमारे दोन लाखांचा गांजा जप्त करण्यात आला.