प्रसिध्द नृत्यागंणा ‘सबसे कातील गौतमी पाटील’ म्हणून प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचलेली डान्सर म्हणजे गौतमी पाटील. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमांना प्रचंड मोठा प्रसिसाद ठरलेलाच,त्यामुळे पोलीस यंत्रणावर सुरक्षा देताना मोठा भार पडतो.त्यामुळे गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगी देताना पोलीसाकडून नकार मिळतो.
आताही करवीर आणि राधानगरी तालुक्यातील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आणि आयोजन बंदोबस्ताचं कारण देत पोलिसांनी ही संमती नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात असे कार्यक्रम आयोजित करु नये असं आवाहनही जिल्हा पोलीस प्रमुख महेश पंडीत यांनी केलं आहे.त्यामुळे संयोजकांना थांबावे लागणार आहे.