इस्लामपूर : सक्त सुचना असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून परवाना नसतानाही ‘डिजे’लावून गणेश विसर्जनाची मिरवणूक काढल्याबद्दल दुधारी ता.वाळवा येथील गणेश मंडळाच्या ११ जणाविरूध पोलीसांना गुन्हा दाखल केला आहे.यावेळी‘डीजे’च्या मोठ्या आवाजाने दुधारी येथील प्रवीण शिरतोडे याचा मृत्यू झाला होता.त्यानंतर विना परवाना मिरवणूक काढली म्हणून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कमरुद्दीन मुलाणी (एमएच ०९ ए ७७५१) या नंबरच्या वाहनमध्ये विना परवाना डिजे लावून सार्वजनिक उपद्रव केला व पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या विसर्जन मिरवणूक मार्गावर सार्वजनिक उपद्रव केला.त्यामुळे या सर्वांविरुद्ध हवालदार सचिन यादव यांनी कलम १८८,२९०, २९९, ३४ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३३(र) (३) / १३१ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे.