तरुण वर्गाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखावा ; दिनकर पतंगे

0जत,संकेत टाइम्स : येळवी ता.जत येथे

श्री नामदेव करे गुरुजी यांचा सत्कार महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आजच्या युगात तरुण वर्गाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान ठेवावा,त्यांना आदराची वागणूक द्यावी तसेच त्यांच्या सुख दुःखात सामील व्हावे असे प्रतिपादन श्री.पतंगे यांनी केले.

यावेळी सुरेश घोडके रा.बिरनाळ यांना महाराष्ट्र कामगार सेनेचे तालुकाप्रमुख पद देऊन त्यांना नेमणूकपत्र देण्यात आले.यावेळी पोपट शिंदे,महेश शिंदे,अर्जुन भोसले,श्रीनिवास पतंगे, नारायण मोटे, प्रभू अंकलगी, रोहित चव्हाण, श्री तोडकर उपस्थित होते.

Rate Card


सुरेश घोडके यांना महाराष्ट्र कामगार सेनेचे तालुकाप्रमुख पदी नेमणूकीचे‌ पत्र देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.