कानोसा | मनात न्युनगंड नको ! 

0
3
जिवन जगत असताना माणसाने मनात कोणताही न्युनगंड बाळगता कामा नये.आपले ध्येय प्रामाणिकपणे असणे गरजेचे आहे.आज प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी धडपडत करतो आहे . पण प्रत्येकालाच यश मिळेल असे नाही.परीस्थीतीतुन जी माणसे पुढे येतात  त्यांचाच गौरव होतो.ज्यांना जिवनात मोठं व्हायचं आहे.त्यांनी मनात कोणताही न्युनगंड बाळगू नये.
आज प्रत्येकामध्ये काही ना काही गुणवत्ता आहे, त्यासाठी. स्वप्न पहा मोठं होण्यासाठी मनात इच्छा असली पाहिजे. त्यासाठी स्वतः ला झोकुन द्या.कोणतीही गोष्ट अशक्य नसते.फक्त मनात न्युनगंड बाळगता कामा नये.उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिले पाहिजे.आणि ती साकारता आली पाहिजे.पावलोपावली कठिण प्रसंग येतील . त्यामुळे हताश होऊ नका.नेहमी आपले सर्वोत्तम प्रयत्न करा.
आपले जीवन सार्थकी लावायचे असेल तर मनात नेहमी चांगला विचार करा.चांगल्या विचारानेच माणसाची प्रगती होते.स्वता:ला भाग्यशाली समजा.नशिबाला दोष देवू नका.आपल्या चिंता ,आपले दुःख हे आपल्यापुरतेच मर्यादित ठेवा.स्वता:चे प्रश्न स्वतः सोडवता आले पाहिजेत.आपल्याला एखादी गोष्ट जमत नसेल तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.
मला एखादी गोष्ट  जमणारच नाही असा न्युनगंड बाळगता कामा नये.मनात नकारात्मक विचार आणू नये.कारण सांगणारे लोक कधीच यशस्वी होत नाही.कोणतेही काम असुद्या प्रामाणिकपणे करा.नेहमी मोठा विचार करा . कोणतीही गोष्ट करायची असेल तर आधी सुरुवात तर केली पाहिजे.प्रवास एका पावलाने सुरू होतो.आधी पाऊल तर टाका .
कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते.ती खेचुन आणावी लागते.प्रत्येकात काही ना काही गुणवत्ता असते .ती सिद्ध करून दाखवता आली पाहिजे.बहुतांश लोक सबबी ,कारणे सांगत बसतात.त्यामुळे कोणतेच काम यशस्वी होत नाही.  मनातील हा न्युनगंड  प्रगतीच्या मार्गातील खरा अडथळा आहे.त्यासाठी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मनात न्युनगंड बाळगता कामा नये.

 

– संतोष दत्तू शिंदे,
मु.पो.काष्टी,ता.श्रीगोंदा जिल्हा,अहमदनगर
महाराष्ट्र
मो.७७२१०४५८४५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here