सरपंचाच्या न्याय हक्कासाठी गेल्या २० वर्षापासून कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या वतीने गेल्या महिन्यात जत तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांची बैठक पार पडली होती. संघटनेत काम करण्यासाठी इच्छुक सरपंचांची मुलाखती पार पडल्या होत्या त्या अनुषंगाने आज मार्केट कमिटी सभाग्रह सांगली येथे अखिल भारतीय सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील (कुर्डूकर) यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदिप मानेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली,जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांनी जिल्हा सचिव राजाराम गुरव यांच्या सहकार्याने जत तालुका कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी जाहीर केल्या.
अन्य निवडी अशा,जिल्हा उपाध्यक्ष बसवराज तेली,जिल्हा सरचिटणीस रमेश साबळे,जिल्हा संघटक लक्ष्मण सुर्वे,महिला जिल्हा उपाध्यक्ष सविता तोरवे.जत तालुकाध्यपदी संस्थान कालीन प्रसिध्द असणारे डफळापूरचे सरपंच सुभाषराव गायकवाड यांची,तर महिला तालुकाध्यपदी वाळेखिंडीच्या सरपंच वसुधा महादेव हिंगमिरे यांची सर्वोनुमते निवड करण्यात आली.इतर निवडी अशा कार्याध्यक्ष हिंदुराव शेंडगे,संघटक मारुती पवार,समन्वयक सुरेश कटरे,उपाध्यक्ष परमेश्वर नरळे,सचिव शिवाजी सरगर,उपाध्यक्ष मदगोंडा सुसलाद,सरचिटणीस विनोद जाधव,उपाध्यक्ष चनाप्पा पट्टनशेट्टी तर महिला कार्यकारणी अशी,कार्याध्यक्ष सौ संगिता लेंगरे,उपाध्यक्षा सौ निकिता कांबळे,सौ आरती अंकलगी सर्व निवडी चुरशीच्या लढतीने होऊन जाहिर करण्यात आल्या.
प्रदिप माने म्हणाले,संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंचांच्या न्याय्य हक्कासाठी लढावे सर्वांनी एकसंघ रहावे व अधिकारी, ग्रामसेवक यांच्यात योग्य दुवा बनुन आपली गावे सक्षम करावीत. याप्रसंगी कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष अरुण भोसले, मळनगावचे संजय चव्हाण व जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी व तालुक्यांतील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग यांनी केले. सूत्रसंचालन सचिव राजाराम गुरव यांनी तर आभार बनाळीचे सरपंच सूर्वे सर यांनी मानले.
जत तालुक्यात सरपंचाचे मजबूत संघटन असेल,तालुक्यातील प्रत्येक गावांच्या विकासासाठी आमचा दबाव गट असेल,प्रशासनाकडून विकासकामाबरोबर नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकजूटीचा मोठा फायदा होणार आहे.प्रत्येक सरपंचाचे प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहिल,असे यावेळी सुभाषराव गायकवाड व सौ.वसुधा महादेव हिंगमिरे यांनी सांगितले.
अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या तालुकाध्यपदी सुभाषराव गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदिप मानेपाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.