प्रंसगी साखरेचे ट्रक फोडू पण 400 रुपये मिळवू,’या’शेतकरी नेत्यांने दिला इशारा

0
सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यानी गतवर्षीचा 400 रुपये हप्ता तातडीने शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावा, अन्यथा साखर गोदामातून बाहेर पडू देणार नाही.यंदाचे धुराडेही पेटू देणार नाही,असा इशारा ‘ढोल बजावो’आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसंतदादा कारखान्यासमोर सोमवारी धनगरी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.या साखर कारखानादाराचे करायचे, काय खाली मुंडी वर पाय, तातडीने दुसरा हप्ता 400 रुपये मिळालाच पाहिजे, 400 रुपये द्या अन्यथा धुराडे बंद अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडन्यात आला.मुख्य प्रवेश द्वारावर ढोल वादन करून कार्यकर्ते कारखाना कार्यालयात आले.त्याठिकाणी आंदोलकां समोर बोलताना महेश खराडे म्हणाले, गतवर्षी साखरेचा दर 3100 रुपये होता आता तो 3800 रुपये वर गेला आहे,म्हणजे कारखानदारांना 3800 रुपये प्रति क्विंटल मिळत आहेत.त्यातील 400 रुपये शेतकऱ्यांना द्या,अशी साधी मागणी आहे.

 

जगात साखरेचा तुटवडा आहे.त्यामुळे साखर दर आणखी वाढणार आहे. आमच्या मागणी नुसार सोमेश्वर आणि मालेगाव या कारखान्यांनी 400 रुपये दिले आहेत.ही मागणी मान्य न झाल्यास यंदाचे धुराडे पेटू देणार नाही आणि साखरेचा एक ट्रकही बाहेर पडू देणार नाही.प्रसंगी ट्रक फोडू पण 400 रुपये मिळवू,असेही खराडे म्हणाले.

 

Rate Card
संदीप राजोबा म्हणाले,साखर सम्राटांनी आमच्या मागणी नुसार तात्काळ पैसे द्यावेत अन्यथा त्याची खैर नाही.उप पदार्थाचे आम्ही मागत नाही,केवळ साखरेच्या वाढीव दराचे आम्ही पैसे मागतो आहोत,ही मागणी मान्य न झाल्यास यंदाच्या हंगामावर परिणाम होईल असा इशारा देत आहोत.

 

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेश खराडे,कार्याध्यक्ष संदीप राजोबा,युवा आघाडी अध्यक्ष संजय बेले, जिल्हा उपाध्यक्ष संजय खोलखुंबे,मिरज अध्यक्ष सुरेश वसगडे,मिरज कार्याध्यक्ष भरत चौगुले,नरवाड उपसरपंच बाळासाहेब लिम्बेकाई,रावसाहेब पाटील, सुधाकर पाटील,पिरगोंडा पाटील,सुनील पाटील,सतीश पाटील,मच्छिंद्र पाटील अजित हलिगळें,अशलेश गाढवे,कामगार आघाडीचे वसंत सुतार,प्रा अजित हलिगले,धण्यकुमार पाटील,रोहित पाटील, दीपक मगदूम,प्रदीप चौगुले,हरिभाऊ कांबळे,संदीप शीरोते,सुरेश पाचीब्रे आदीसह अन्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.