वाणीवर नियंत्रण हवे !

0
9
मनुष्याला मानवजन्म खुप भाग्याने मिळाला आहे.माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे.त्यामुळे चांगल्या रितीने जगण्यासाठी आपल्या वाणीमध्ये गोडवा असणे खुप गरजेचे आहे.जी माणसं आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवू शकतात .तेच माणसं जीवनात सुखी व समाधानी आहेत.आज सर्व काही बदलता येईल पण माणसाचा स्वभाव बदलणे खुप अवघड आहे.माणसाने नेहमी तोंडामध्ये साखर , डोक्यावर बर्फ ठेवून वागले पाहिजे ‌‌‌‌.
सुर्य प्रकाश देतो,ढग पाऊस देतो,फुले सुगंध  देतो.त्याचप्रमाणे माणसाने सुद्धा एकमेकांना प्रेम देण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी नेहमी गोड बोलले पाहिजे.गोड बोलण्याने सर्वजण प्रसन्न आनंदी राहतात.सर्वांशी मिळुन. मिसळुन वागले पाहिजे.मधुर बोलले पाहिजे.माणसाच्या मुखात नेहमी गोडवा असला पाहिजे.या जगात सुंदर आपले विचार व वागणे,बोलणे यातच खरी सुंदरता आहे.
आयुष्यात येणारा क्षण खुप महत्वाचा आहे.एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल तर ती बदलण्यासाठी  प्रयत्न करा.लोकांशी चांगले वर्तन ठेवा.बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा  वाणीवर नियंत्रण असणे माणुसकीसाठी  अति उत्तम आहे.ज्याची वाणी मधाळ असते .तोच प्रेमाने जग जिंकू शकतो.
निसर्गाने वाणी फक्त मनुष्याला दिली आहे.नेहमी मुखातुन चांगले बोलले पाहिजे.वाणीवर नियंत्रण नसल्याने कटुता निर्माण होते.आयुष्यात चांगले माणसं जोडायची  असतील तर वाणीवर नियंत्रण हे असायलाच हवे.कधी कधी माणसाचा वाणीवरील तोल सुटतो.तेव्हा बोलताना जपून बोलावे.शब्दांचे घाव हे खुप गहरे असतात.बोललेले शब्द कधीच भरून येत नाही.त्यासाठी वाणीवर नियंत्रण असायला हवे
संतोष दत्तू शिंदे
मु.पो‌.काष्टी ,ता.श्रीगोंदा ,जिल्हा , अहमदनगर
महाराष्ट्र
मो.७७२१०४५८४५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here