वाडीवस्तीच्या रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे काढून रस्ते खुले करा
जत शहरामध्ये नगरपालिका हद्दीतील शेतकरी वाड्या वस्त्यांवर राहत असून त्यांना शहरामध्ये येणाऱ्या रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली असून त्यामुळे वाडीवस्तीवरील शेतकरी, नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्त्याच्या कडेला असलेली काटेरी झुडपे काढून रस्ता खुला करण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
जत नगरपरिषद हद्दीत कडीमळा, माने वस्ती, वाघमोडे वस्ती,गावडे वस्ती,पवार मळा, कोळी वस्ती,पाटील मळा ,तंगडी मळा, मळगे वस्ती,तसेच शहराच्या विस्तारित भागात पाऊसाने चिखल दलदल झाली असल्याने नागरिकांची,विद्यार्थ्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असल्याने चिखल दलदल झालेल्या ठिकाणी मुरूम टाकून घ्यावा तसेच रस्त्याच्या कडेला असलेली काटेरी झुडपे काढून घ्यावीत जेणेकरून नागरिकांना येणेजाणे सोईचे होईल अशी मागणी विक्रम ढोणे यांनी नगरपालिकेकडे केली आहे.
साथीचे रोग पसरण्याची शक्यता
शहरातील अनेक भागात गटारी तुंबल्या असल्याने आणि पाऊसाची रेलचेल झाल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे तुंबलेल्या गटारी स्वच्छ करून घ्याव्यात जेणेकरून पाण्याचा निचरा सुलभ होईल अन्यथा साठून त्यामध्ये डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होऊन शहरात साथीचे आजार पसरण्याची भीती आहे.बाजारपेठेतील काही भागातील नागरिकांना डेंग्यू झाल्याचे आढळून येते आहे त्यामुळे डास प्रतिबंधक औषध फवारणी संपूर्ण शहरासह वाडीवस्तांवर करण्याची मागणी युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे.