वांगी : कडेगाव तालुक्यातील वांगी या गावात धक्कादायक प्रकार समोर आला असून थोर स्वातंत्र्य शाहीर शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोकराव निकम यांच्या घराला समोरच्या व मागील बाजूने विद्युत वाहक तारेतून ११ केव्हीचा मोठा शॉक देऊन संपूर्ण कुुटुंबातील सर्वाना मारण्याचा कट उघडकीस आला आहे.नशिब बलवत्तर म्हणून विद्युत वितरण कंपनीची वांगी गावची वीज बंद पडल्यामुळे संपूर्ण कुटुंबातीस सर्वजण वाचले आहेत.यूपी आणि बिहारला लाजवेल अशी क्रूर आणि माणुसकीला काळिमा फासणारी प्रकाराचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
अधिक माहिती अशी,अशोक निकम हे मंगळवारी पत्नी व दोन मुलांसह झोपी गेले.रात्री १ वाजता अचानक घरासमोर विजेचा मोठा आवाज आला,झाळही दिसला घरातील वीज गेली.घराजवळच विजेचा ट्रान्सफाॅर्मर असल्यामुळे शॉर्ट होऊन जाळ झाला असेल असे समजून निकम यांनी दुर्लक्ष केले.दुसऱ्यांदा वीज आल्यानंतर पुन्हा एकदा जाळ झाल्यामुळे त्यांनी बॅटरीच्या उजेडाने बाहेर डोकावल्यानंतर त्यांना वीज वाहक तार घराच्या अगदी दरवाजाजवळ अडकवलेली दिसली.ती तार ११ केव्ही ट्रान्सफाॅर्मरवरला जोडून करंट दिल्याचे उघडकीस आले,काही समाज सुधारकांनी यांची पोलीसांना कल्पना दिली.मात्र अशा पध्दतीने संपूर्ण कुंटुबांला जिंवत ठार मारण्याच्या हा निंदनीय प्रकार महाराष्ट्र घडता घडता,नियतीच्या सतर्कतेमुळे टळला आहे.