जातीवाचक शिवीगाळ, शेगावच्या तिंघावर गुन्हा दाखल
जत,संकेत टाइम्स : शेगाव ता.जत येथे एकास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघाविरोधात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अंतर्गत जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी प्रदिप सुखदेव बुरूटे (वय 33) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब काशीराम हिरवे,अविनाश उर्फ बंडू बाळासाहेब हिरवे,किसन उर्फ समाधान माणिक पडोळकर सर्वजण (रा.शेगाव)यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.घटना सकाळी साडेसहा वाजता घडली.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, फिर्यादी प्रदीप सुखदेव बुरूटे हे मोटारसायकल वरून विहीरीतून घराकडे संशयितांनी फिर्यादी प्रदीप यांचा रहदारीचा बंद केलेल्या मार्गावरून जात असताना संशयितांनी जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या घरासमोरून जायाचे नाही म्हणत कोयता, काठीने मारहाण करून जखमी केले.त्यानंतर फिर्यादी प्रदीप जत येथे पोलीसात तक्रार देण्यासाठी येत असताना पोलीसात तक्रार दिलास तर तुला सोडणार नाही,असे म्हणत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

त्याचबरोबर फिर्यादी प्रदीप जत ग्रामीण रुग्णालयातून उपचार करून येत असताना संशयितांनी पाठलाग करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार भादविस 326,324,341,504,506,व अनुसूचित जाती व जमा तीन प्रतिबंध अधिनियम 1989 चे सुधारित कलम अधिनियम 2015 चे कलम 3(1)(आर)(एस),3(2),(व्ही.ए.)प्
संशयित प्रदीप सुखदेव बुरूटे रा.शेगाव यांनी घरासमोरील वाटेवरून जात असताना संशयितांनी डोकीत कोयत्यांनी मारहाण करून जखमी केले.वाईटवगाळ शिवीगाळ केली.भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी बाळासाहेब हिवरे यांच्या पत्नी शारदा यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण केली.पोलीसांनी संशयिताविरोधात भादवि 326,323,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
