भिवर्गीचे संरपच मदगोंड सुसलाद यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव,मान्यवराकडून सत्कार

0भिवर्गी,संकेत टाइम्स : भिवर्गी (ता.जत) चे सरपंच मदगोंड सुसलाद,पोलीस पाटील श्रीशैल चौगुले  यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.मोरबगीच्या सरपंच सौ.कविता मांग, उपसरपंच राजकुमार नंदूर यांच्याहस्ते मानाचे फेटा बांधून,शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. 


सुसलाद यांना तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सांवत,कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, कार्याध्यक्ष नाना शिंदे,सचिव समाधान शिंदे,उपसरंपच बसवराज चौगुले यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.

यावेळी जत तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या सदस्य हणमंत नंदूर म्हणाले की,गाव पातळीवर “अशक्य ते शक्य करणारा नेता म्हणून सरपंच यांना मानले जाते,भिवर्गीला सुसलाद यांच्या रुपाने असे युवा नेतृत्व  लाभले आहे.विकास कामातून ते जनतेचा विश्वास सार्थ ठरवतील. 


सरपंच सौ. कविता मांग म्हणाले की,गावांच्या विकासासाठी सर्वोत्तम योगदान देऊन नागरिकांचे प्रश्न सुसलाद यांनी सोडवावेत,तेच त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा ठरतील.

Rate Card

उपसरपंच राजकुमार नंदूर म्हणाले की,वाढदिवस सगळ्यांसाठी खास दिवस असतो.तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जीवनातील आनंद अधोरेखित करणारा दिवस आहे,तो सार्थकी लावावा.

रमेश चौगुले यांनी आभार मानले.

यावेळी मोराबगीचे तिप्पांना बिरादार, संतोष पाटील, चिदानंद बिज्जरगी, चंद्रकांत दंदर्गी,भिवर्गीचे बाळासाहेब सुसलाद, हणमंत पाटील, प्रकाश चौगुले, शीलिशिद्द बिराजदार उपस्थित होते.भिवर्गी ता.जत येथील संरपच मदगोंड सुसलाद व श्रीशैल चौगुले यांचा यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.