वेळेत मदत मिळाली नाही,अपघातात दुचाकीस्वार ठार
जत: विजापूर गुहागर महामार्गावर जत तालुक्यातील बिरनाळ फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे एकजण जागीच ठार झाला. भीमराव दादू चौगुले (वय ५५, रा. बागेवाडी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.अपघात रविवारी रात्री घडला. मात्र, सोमवारी पहाटे उघडकीस आला. भीमराव हे
रविवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग ओलांडून घराकडे जात होते.

बिरनाळ हायस्कूलजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.धडकेनंतर गंभीर जखमी अवस्थेत ते घटनास्थळी पडून होते.त्यांना मदत न मिळाल्याने जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत भीमराव हे जत पोलिस कर्मचारी श्यामराव चौगुले व जत हायस्कूलचे शिक्षक शिवाजी चौगुले यांचे बंधू होत.