समाजात वावरताना अवती भवती असणाऱ्या सजीव – निर्जिव वस्तु मानवाला नेहमीच उपयोगी पडतात. अनेक निर्जीव वस्तूंचे मानवांच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे. मात्र त्यांचे महत्व सर्वसाधारण व्यक्तीला कधी कधी समजत नाही. त्यातलाच एक प्रकार म्हणजे दिवाळीचा फराळ ‘ दिवाळी म्हणजे आनंदचा क्षण. गरीब आणि श्रीमंत दोघेही या क्षणाचा पुरे पुर आनंद लुटतात ! “ज्या निर्जीव वस्तुंनी आयुष्यात पावलो पावली संघर्षाची झळ सोसलीय तिच वस्तु नकळत नेहमी इतरांना आनंद व सुख समाधान देऊ शकते, कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कुणालाच ठाऊक नसते.” म्हणूनच त्यांचे महत्व माणसांना कळत नाही.
दिवाळी सणाला सुरुवात होते ती सुगंधी उटण्याने उटणे सांगते – आपले शरिर नेहमी उटण्या सारखे सुगंधीत ठेवण्याचा प्रयत्न करा. संसारात सुगंध होऊन दरवळत रहा आणि सर्व कुटुंब नेहमी सुगंधमय कसे राहील याचा विचार करा. आपल्या कुटुंबावर येणाऱ्या संटाना कारीटा प्रमाणे पायाच्या अंगठ्याने चिरडून टाका. म्हणून नेहमी सुगंधीत उटण्या सारखे प्रसन्न राहा. रांगोळी म्हणजे जीवनात कितीही वाईट दिवस आले तरी नेहमी त्यात रांगोळी सारखे रंग भरण्याचा प्रयत्न करा म्हणजे संसार सुध्दा अनेक रंगानी भरलेला दिसेल. आकाश कंदील – आकाश कंदील सांगतो. आपल्या आजु- बाजुचा परिसर प्रकाशमय करा जेणेकरून नवतरुणांना त्या प्रकाशात उत्कर्षाचा व प्रगतीचा मार्ग सापडेल. असे प्रकाशमय होऊन प्रगतीची, उत्कर्षाची व भरभराटीची आकाशात उंच भरारी घ्या आणि जगाला दाखवून द्या की प्रयत्नात आणि चिकाटीत सफल होण्याची मोठी ताकद असते. म्हणून बुजुर्ग म्हणतात- ‘डोळे तर जन्मताच असतात कमवायची असते ती नजर, वाईटातून चांगल्या गोष्टी शोधण्याची.’ आपल्या परिसरात खुप चांगल्या गोष्टी असतात पण त्या पहाण्याचे आपण प्रयत्न करीत नाही.
पणती पणती सांगते मी स्वता जळते आणि दुसऱ्यांचे आयुष्य उजळून टाकते. तेव्हा मला किती वेदना होतात त्याच्याकडे माझे लक्ष ही जात नाही. जसे घरातील कर्ता आयुष्यभर जळतो आणि संपूर्ण कुटुंब तेजोमय करुन सोडतो. ‘ ज्याला संधी मिळते तो नशिबवान, जो संधी निर्माण करतो ती बुध्दीवान, पण जो संधीचे सोने करतो तोच खरा विजेता. आनंद शोधु नका तर तो निर्माण करा.’ म्हणूनच आकाशकंदील, पणती यांच्या दुःखात प्रत्येकाने आपला आनंद सोधण्याचा प्रयत्न करा. लाडू- हा पदार्थ अनेक संकटांना तोंड देऊन बनतो आणि तो आपल्याला विशिष्ठ चवदारपणा देतो. अनेक पदार्थांना एकत्र करून ठेवण्याची ताकद या लाडवात असते. म्हणून या लाडवाचे आपल्या जीवनातील स्थान कर्त्या व्यक्तीप्रमाणे असते. तो सर्व कुटुंबाला लाडवा प्रमाणे एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतो. चकली सांगते जीवनात कितीही संकटे आली तरी थांबू नका मिळेल त्या आणि तश्या वाटेने पुढे जात राहा जसा प्रत्येक घरातील कर्ता संकटांवर मात करून आपले कुटुंब चालवत असतो. करंजी – करंजी प्रमाणे घरातील कर्ता शक्यतो सर्वांचेच अपराध करंजी प्रमाणे आपल्या पोटात घालती आणि कुटुंब नेहमी मुखी आणि समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करती.
शंकरपाळी – सांगते अडचणी व संकटे आलीच तर चारही बाजुने विचार करा आणि संकटांचा समना करा यश नक्कीच मिळेल. चिवडा चिवडा सांगतो- जशी मला तिखट मिठाशिवाय गोडी नाही तशीच प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अडी-अडचणींशिवाय मजा नाही. मानवाला जर अडी- अडचणी व संकटे आली तरच तो त्यापासून बाचायचे मार्ग शोधतो. म्हणूनच दिवाळीतील फराळा प्रमाणे राहाण्याचा प्रयत्न करा कारण त्या पदार्थांचे महत्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. कारण ” आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..प्रेम मधुर आहे त्याची चव चाखा ..क्रोध घातक आहे त्याला गाडुन टाका.. संकटे ही क्षणभंगुर आहेत त्यांचा सामना करा.. आठवणी या चिरंतर आहेत, त्यांना हृदयात साठवुन ठेवा.” दिवाळीच्या फराळासारखे राहाण्याचा आपण सर्वानी प्रय्तन करुया. म्हणजे प्रत्येक व्यक्ती संसारात आणि समाजात समाधानी राहील.
दत्ताराम दळवी,लालबाग
9820527855