चाय सुट्टा बारने आपला विस्तार एशियातील ‘हळदीचे शहर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सांगलीपर्यंत वाढवला!

0
3

सांगली : चाय सुट्टा बार ही चहाची सर्वात मोठी शृंखला आहे आणि जगभरात ती अनोख्या संकल्पनेच्या अस्सल चहाचा अनुभव देणारी, आकर्षक वातावरण प्रदान करणारी शृंखला म्हणून ओळखली जाते. चाय सुट्टा बारने सांगली या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहरात नवीन दुकान उघडल्याची घोषणा केली आहे. हे नवीन दुकान पर्ल एन्क्लेव्ह, दुकान नंबर 1 आणि 2, सफा बेकरीच्या समोर, विश्रामबाग, सांगली, महाराष्ट्र – 416416 येथे उघडण्यात आले असून आता सांगली शहरात देखील ते चाय सुट्टा बारचा खास चहाचा स्वाद आणि आकर्षक वातावरण घेऊन येणार आहे.

 

चाय सुट्टा बार म्हणजे दर्जेदार चहाचा अनुभव आणि 2016 मध्ये स्थापना झाल्यापासून पाहता पाहता ती जगातील सर्वात मोठी चहाची शृंखला बनली आहे. अनुभव दूबे आणि आनंद नायक यांनी इंदूरमध्ये सुरू केलेल्या चाय सुट्टा बारची स्थापना भारताचे सर्वात लोकप्रिय पेय- चहा आधुनिक आणि आकर्षक वातावरणात सादर करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. तेव्हापासून निवांतपणे चहाचा आस्वाद घेण्यासाठी तरुणांची ती लाडकी जागा बनली आहे.

 

चाय सुट्टा बारचा सह-संस्थापक आणि सीईओ अनुभव दूबे याने सांगलीत आपले दुकान उघडत असल्याबद्दलचा उत्साह व्यक्त केला आणि उत्तम चहाचा अनुभव देण्याच्या आपल्या अढळ वचनबद्धतेविषयी बोलताना तो म्हणाला, “सांगली या सुंदर शहराला चाय सुट्टा बारचा परिचय करून देताना आम्ही रोमांचित आहोत. आमचा उद्देश या प्रांतातील लोकांना आमचे असामान्य चहाचे ब्लेंड आणि सौहार्दपूर्ण वातावरण यांचा परिचय करून देण्याचा आहे, कारण चाय सुट्टा बार याच गोष्टींसाठी ओळखला जातो. आमचे असे ठाम मत आहे की आपल्या लोकांचे चहा-प्रेम अमर्याद असते.”

 

चाय सुट्टा बारचा सह-संस्थापक आनंद नायक म्हणतो, “चाय सुट्टा बारची वाढ पाहताना आम्हाला खूप आनंद होत आहे. जेथे लोक एकत्र होऊ शकतील आणि जीवनातील छोट्या छोट्या सुखांचा आस्वाद घेऊ शकतील असे एक सौहार्दपूर्ण आणि समावेशक वातावरण निर्माण करणे हेच आमचे मिशन आहे आणि सांगलीत एक दुकान उघडणे हे त्याच दिशेने आम्ही उचललेले एक पाऊल आहे. सांगलीतील लोकांचे चाय सुट्टा बारमध्ये स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

 

चाय सुट्टा बार सध्या देशातील 300+ शहरांमध्ये उपस्थित आहे, जेथे दररोज तब्बल 4.5 लाख कुल्लडमधून चहा ग्राहकांपर्यंत पोहोचतो. ग्राहकांना जो आगळावेगळा अनुभव येथे मिळतो, त्याच्यामुळेच ही प्रचंड वृद्धी साध्य झाली आहे. या ब्रॅंडची उलाढाल 150 कोटींपेक्षा जास्त आहे. अशा प्रकारे भारतातील चहा-कॉफी क्षेत्रातील ही एक उल्लेखनीय कंपनी आहे.

 

सांगलीत चाय सुट्टा बारचा विस्तार म्हणजे एकत्र येऊन चहा पिण्यासाठी लोकांना अनुकूल जागा ऑफर करण्याच्या मिशनमधले त्यांचे एक लक्षणीय पाऊल आहे. हा ब्रॅंड हे पुन्हा स्पष्ट करू इच्छितो की, ब्रॅंडचे नाव तसे सुचवत असले, तरी येथे हानिकारक पदार्थांचा प्रचार केला जात नाही. चाय सुट्टा बार हा ब्रॅंड निरोगी जीवनशैलीचा पुरस्कार करतो आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी आपल्या दुकानांच्या आसपासच्या स्थानिक प्राधिकाऱ्यांशी सहयोग करतो.

 

पारंपरिक मातीच्या कुल्लडमधून चहा देऊन, शाश्वततेच्या वचनाशी एकनिष्ठ असलेला चाय सुट्टा बार जवळ जवळ 500 कुंभार कुटुंबांसाठी रोजगार संधी देखील उत्पन्न करत आहे. ‘केवळ उत्तम चहा प्रदान करायचा नाही, तर आपल्या ग्राहकांच्या समुदायावर सकारात्मक प्रभाव देखील टाकायचा’ या ब्रॅंडच्या विचारसरणीला अनुसरूनच ही प्रथा त्यांनी जोपासली आहे.

 

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here