अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारी सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार

0सांगली : राज्य शासनाकडील आदेशान्वये कोव्हीड पॉझिटीव्हीटी दर व व्यस्त ऑक्सिजन बेड टक्केवारी नुसार राज्यातील जिल्ह्यांना 1 ते 5 स्तर (Level) मध्ये प्रतिबंधात्मक आदेश (Break the Chain Order) पारित करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. राज्य शासनाकडील दि. 10 जून रोजीच्या आदेशान्वये जाहीर केलेल्या दि. 10 जून 2021 रोजी संपणाऱ्या आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोव्हीड पॉझिटीव्हीटी दर 5 टक्के पेक्षा जास्त पण 10 टक्के पेक्षा कमी आहे आणि व्यस्त ऑक्सिजन बेड टक्केवारी 25 टक्के पेक्षा जास्त पण 40 टक्के पेक्षा कमी आहे. राज्य शासनाकडील आदेशानुसार सांगली जिल्हा स्तर 3 (level 3) मध्ये आलेला असल्याने, राज्य शासनाने स्तर 3 (level 3) साठी निर्धारित केलेले प्रतिबंध सांगली जिल्ह्यात लागू करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी राज्य  शासनाच्या  निर्देशानुसार

सांगली जिल्ह्यात दि. 14 जून 2021 रोजीचे सकाळी 5 वाजलेपासून ते दि. 21 जून 2021 रोजीचे सकाळी 5 वाजेपर्यंत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

1.    कलम 144 आणि संचारबंदी लागू करणे जमाव बंदी व संचार बंदी

अ.    सांगली जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणेत येत आहे.

ब. सदर कालावधीत सकाळी 05.00 ते सायंकाळी 05.00 पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस मनाई आहे. सायंकाळी 05.00 ते सकाळी 05.00 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करणे येत असून आहे. संपूर्ण संचारबंदी कालावधीत वैध कारणाशिवाय किंवा खाली दिलेल्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे.

क. खालील अत्यावश्यक बाबींमध्ये उल्लेख केलेल्या सेवा आणि क्रियांना सूट देण्यात आली आहे आणि त्यांच्या हालचाली आणि ऑपरेशन्स प्रतिबंधित नसतील. 

 ड. सदर आदेशात सूट देणेत आलेल्या बाबी व आस्थापना (Exemption Category मुद्दा क्र.6 मध्ये नमूद बाबी व आस्थापना) यांना सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत परवानगी असेल.

2.   अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश असेल

1)    रुग्णालयेनिदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies), औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी असेल. लस, सॅनिटायझर, मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण.

2)   व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, ॲनिमल केअर शेल्टर्स. 

3)   वनविभागाने घोषित केले प्रमाणे वनीकरण सबंधित सर्व कामकाज.

4)  सर्व किराणा, भाजीपाला दुकान, फळ विक्रेते, दुध व दुग्ध पदार्थ, डेअरी, बेकरी, मिठाई, पेट शॉप्स व सर्व प्रकारची खाद्य दुकाने (मटन, चिकन, पोल्ट्री, मासे व अंडी यांसह) सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00  वाजेपर्यंत सुरु राहील. माल वाहतूक सेवा सुरु असलेने सदर वस्तूंचा माल हा सबंधित दुकानात उतरविणे अथवा चढविणेच्या प्रक्रियेस सदर वेळेचे बंधन असणार नाही. सदर दुकानामधून घरपोच सेवा सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत देता येईल.

5)  कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ मार्केट मधील सर्व व्यवहार सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच सदर ठिकाणी लोकांची गर्दी होणार नाही / राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने कॉव्हीड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणेत येईल याची दक्षता पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व व्यवस्थापक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी घेणे बंधनकारक राहील. सदर ठिकाणी कोव्हीड-19 नियमांचे उल्लंघन होत असलेचे निदर्शनास आलेस सदर आस्थापना बंद करणेचे अधिकार  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास असतील. 

6)   दुध संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया कोणत्याही प्रतिबंधाशिवाय सुरु राहतील.

7)  जिल्ह्यातील सर्व अधिकृत भाजीमंड्या सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 सुरु राहतील. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व आठवडा बाजार बंद राहतील.

8)   शीतगृहे व गोदाम सेवा

9)   सार्वजनिक वाहतूक  रेल्वे, टैक्सी, रिक्षा व सार्वजनिक बसेस

10)स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम

11) स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा

12)रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे विहित केलेल्या सर्व अत्यावश्यक सेवा

13)भारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळ (SEBI) ची कार्यालये आणि SEBI मान्यताप्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज (stock exchanges), डिपॉजिटर्स (Depositories) व क्लेअरिंग कॉर्पोरेशन्स (Clearing Corporations) व SEBI कडे नोंदणीकृत असलेले एजंट

14)        शेतीविषयक सेवा व शेती सुरु राहण्यासाठी शेतकरी यांना आवश्यक असणाऱ्या बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्तीची सेवा देणाऱ्या, तसेच पशुखाद्य दुकाने यांच्या आस्थापना सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. सदर दुकानामधून घरपोच सेवा सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत देता येईल.

15)        टेलीकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणाऱ्या सेवा

16)वस्तूंची वाहतूक

17)        पाणीपुरवठा सेव

18)सर्व वस्तूंची आयात व निर्यात

19)       प्रसार माध्यमे (Media)

20)        पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम सबंधित उत्पादने

21)विद्युत व गॅस पुरवठा सेवा

22)        सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा { मालवाहतूक वाहनामधून तीन पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवास करणेस प्रतिबंध असेल. }

23)         मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज सुरु राहतील.

24)        डेटा केंद्रे (Data Centers) / क्लाउड सेवा वितरक (Cloud Service Provider) / पायाभूत सुविधा आणि सेवांसाठी आवश्यक माहिती व तंत्रज्ञान सेवा (IT Service)

25)        शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा

26)         ATM’s

27)        टपाल सेवा

28)        बंदरे आणि सबंधित सेवा

29)         लस / औषधे / जीवनरक्षक औषधे सबंधित वाहतूक हाताळणारे कस्टम हाउस एजंट (Custom House Agent) / परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स (Multi Modal Transport Operators)

30)         कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा कच्चा माल व त्याची पॅकेजिंग मटेरियल (Packaging meterial) ची उत्पादन केंद्रे.

31) व्यक्ती अथवा संस्थांसाठी पावसाळयामध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणारी केंद्र.

 

   वर नमूद केलेल्या सेवांची अंमलबजावणी करून घेणाऱ्या संस्थांनी खालील बाबींचे पालन करणे बंधनकारक आहे.

1.       सर्व अंमलबजावणी प्राधिकरण / संस्था यांनी हि बाब लक्षात घ्यावी कि, सदर आदेशामध्ये वस्तू व माल यांच्या वाहतुकीवर प्रतिबंध / निर्बंध नसून सदरचे निर्बंध / प्रतिबंध हे लोकांच्या हालचालीवर आहेत.

2.      यामध्ये नमूद सर्व सेवांची वाहतूक हि वर नमूद 1(ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.

3.      अत्यावश्यक सेवा सुरू राहणेसाठी व त्यांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व स्थळकाळानुरूप सेवा देणारे व्यक्ती आणि संस्था या अत्यावश्यक सेवेमध्ये गणल्या जातील. महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक सेवा या अत्यावश्यक सेवा समजल्या जातील हे तत्व लक्षात ठेवावे. (Principal is essential for essential is essential.)

3.  i. अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारी सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. तथापि सदर आस्थापना शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील.

  ii. सूट देणेत आलेल्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व खाजगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत 50 % क्षमतेने सुरु राहतील. तथापि सदर कार्यालये शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील.

4. या आदेशातील मुद्दा क्र. 2 व 3 मध्ये नमूद दुकानांनी खालील निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.

अ.    संबंधीत अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक व कामगार / कर्मचारी व ग्राहक हे कोव्हीड- 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करतील.

  ब. अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक व कामगार यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. उदा. विक्रेता व ग्राहक यांमध्ये पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) इत्यादी.

क.    अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केलेस त्यांचेवर र.रु.500/- इतका दंड आकाराला जाईल आणि जर एखादा ग्राहक कोव्हीड-19 विषयक नियमांचे पालन करीत नसताना सबंधित दुकानातून जर सदर ग्राहकास सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर र.रु.1000/- इतका दंड आकारला जाईल. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना / दुकान बंद केले जाईल.

ड. अत्यावश्यक सेवा सबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास / हालचालीस  वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.

          इ. या आदेशामध्ये 2 – (3) मध्ये नमूद केलेनूसार किराणा सामान दुकानेभाजीपाला दुकानेफळविक्रेतेदुध डेअरीबेकरीमिठाईखाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने एकत्रित असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येत आहेत अशा ठिकाणाबाबत स्थानिक प्रशासनाने योग्य ती अनुषांगीक उपाययोजना कराव्यात. कायमस्वरूपी त्या ठिकाणी नसलेल्या वरील सेवाबाबत खुल्या सार्वजनिक जागा शोधून त्या ठिकाणी त्यांना सेवा देणेबाबत जागा नेमून देता येतील. स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवेची ठिकाणे ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत होणार नाहीतयाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. स्थानिक प्रशासनास आवश्यकता भासल्यास वरील सेवाबाबत काही सार्वजनिक ठिकाणे ही कायमस्वरूपी बंद करता येतील.

     फ. सद्यस्थितीत बंद असणाऱ्या दुकानांच्या दुकान मालक यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्याकडे काम करीत असणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) वापरून ग्राहकांशी संवाद साधनेसाठी तयार करावे. जेणेकरून शासनास सदरची दुकाने लवकरात लवकर खुली करता येतील.

5. सार्वजनिक वाहतूक –

सार्वजनिक वाहतूक खालील प्रमाणे सुरु राहील

रिक्षा                        चालक + 2 प्रवासी.

टैक्सी ( 4 चाकी )   – चालक + RTO नियमाच्या अनुज्ञेय प्रवासी क्षमतेप्रमाणे.

   बस       – राज्य शासन किंवा स्थानिक प्रशासनाच्या मालकीच्या सार्वजनिक बसेसमध्ये क्षमतेच्या 100  टक्के प्रवासी घेता येईल आणि कोणताही प्रवासी उभा राहून प्रवास करू शकणार नाही.

i. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींनी मास्क चा वापर करणे बंधनकारक असेल. सदर आदेशाचे उल्लंघन केलेस प्रतिव्यक्ती र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.

ii.  टैक्सी (4 चाकी) मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान केला नसेल तर मास्क परिधान न करणारी व्यक्ती व वाहन चालक यांचेकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.

iii.               प्रत्येक प्रवासानंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल.

iv. सर्व सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणारे कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे आणि कोव्हीड-19 च्या निर्देशांचे फलक लावावे. टैक्सी व रिक्षा चालक यांनी स्वतःला प्रवाशांपासून प्लास्टिक आवरणाने अथवा इतर आवरणाने अलगीकरण करून घेणे बंधनकारक असेल.

v.   सार्वजनिक वाहतुकीसबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवासास वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.

vi.      सार्वजनिक वाहतुकीस वरील अटी च्या आधारे परवानगी देत असताना सदरची वाहतूक सुरळीतपणे सुरु राहणेसाठी आवश्यक असणाऱ्या इतर सर्व सेवा सुरु राहतील. सदर सेवेमध्ये हवाई सेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या मालवातुक सारख्या सेवा, तसेच तिकीट विषयक सेवांचा समावेश राहील.

vii.   बस, ट्रेन, विमानाने येणाऱ्या / जाणाऱ्या प्रवाशांना सदर ठिकाणाहून घरी जाणेस अथवा येणेस सोबत तिकीट बाळगणेच्या अटीवर परवानगी असेल.

viii. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी हे प्रवेश पॉईंटवर रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) चाचणी करण्यासंबंधी निर्णय घेतील आणि कोणत्याही मान्यताप्राप्त प्रयोगशाळेला या सेवेसाठी नियुक्त करतील. जर ठरवले असल्यासया चाचणीचा खर्च प्रवाशाला करावा लागेल.

6.  सूट देणेत आलेल्या बाबी / आस्थापना (Exemption Category)

 

अ)   कार्यालये

–         खालील कार्यालयांना सूट असेल

i.   केंद्रीयराज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ठ असलेली सर्व वैधानीक प्राधिकरणे व संस्था 

ii.सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) व खाजगी बँक

iii.   अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कंपनींची कार्यालये

iv.   विमा / वैद्यकीय हक्क सबंधित सेवा

v. औषध उत्पादन / वितरण सबंधित नियोजन करणारी कार्यालय

vi.   भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिनस्त असलेल्या संस्था व मध्यस्थीच्या समावेशासह स्टँडअलोन प्राइमरी डीलर्स (Intermediaries including standalone primary dealers). क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), पेमेंट सिस्टम ऑपरेटर (Payment System Operators), RBI ने नियमन केलेल्या बाजारामध्ये सहभागी होणारे वित्तीय बाजार.

Rate Card

vii. सर्व नॉन बँकिंग (Non-Banking) वित्तीय महामंडळे

viii.                       सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था (Micro Finance Institutions)

ix.    सर्व वकील यांची कार्यालये

x.      सनदी लेखापाल (Chartered Accountant) यांची कार्यालये

·        कोव्हीड -19 आपत्तीमध्ये कामकाज करत असलेली सर्व शासकीय कार्यालये / सेवा वगळून, वर नमूद कार्यालये ही आवश्यक असलेला कमीत कमी कर्मचारी वर्ग हा त्याच्या क्षमतेच्या 50 % पर्यंतच्या मर्यादेत कर्मचारी उपस्थित राहून सुरू राहतील.

·        उपरोक्त मुद्दा क्र.2 मध्ये नमूद इतर अत्यावश्यक सेवेतील कार्यालये 50 % पेक्षा जास्त नसेल इतक्या कमीत कमी कर्मचारी क्षमतेसह सुरु राहणेस परवानगी असेल. जे व्यक्ती प्रत्यक्ष अत्यावश्यक सेवा पुरवितात त्यांनी त्यांची कर्मचारी संख्या कमी करावी तथापि अपवादात्मक परिस्थितीत ती 100 % पर्यंत ठेवता येवू शकेल.

·        इतर सरकारी कार्यालयांबाबत सबंधित विभाग प्रमुख हे कर्मचाऱ्यांच्या आवश्यक जास्तीच्या उपस्थिती बाबतचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीने घेवू शकतील.

·        स्थानिक संस्था / सहकारी संस्था यांच्या बैठका व निवडणुका नियमित पद्धतीने घेणेस मान्यता देणेत येत आहे. स्थानिक संस्था / सहकारी संस्था यांच्या बैठका व निवडणुका या सामाजिक अंतर राखनेच्या दृष्टीने, एकत्रित येणाऱ्या लोकांच्या संख्येच्या दुप्पट क्षमता असलेल्या सभागृहात / मैदानात आयोजित करण्यात याव्यात. असे करणे शक्य नसल्यास सदर बैठका ऑनलाईन (Online) पद्धतीने घेणेत याव्यात. तसेच या संदर्भात राज्य शासनाच्या सबंधित विभागाने विशिष्ट आदेश निर्गमित केले असल्यास त्याचे पालन करावे.

·        सदर कार्यालयामध्ये काम करीत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर नमूद 1 (ब) च्या मनाई आदेशातून वगळणेत येत आहे.

·        अभ्यागतांना शासकीय कार्यालयात / कंपनीत येणेस प्रतिबंध असेल व शासकीय कार्यालये / कंपनी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस कार्यालयाबाहेरील व्यक्तींची उपस्थिती आवश्यक असलेस, अशा बैठकी Online आयोजित कराव्यात.

·        सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

ब)    खाजगी वाहतूक

1.       वाचले क्र.11 चे राज्य शासनाचे आदेशान्वये स्तर 5 (Level 5) मध्ये निश्चित केलेल्या जिल्ह्यातून येणाऱ्या अथवा तेथे थांबा घेतलेल्या प्रत्येक प्रवाशाजवळ ई-पास असणे बंधनकारक राहील. 

2.      सदर नियमाचे उल्लंघन केलेस संबंधीतावर र.रु.1000/- इतका दंड आकारणेत येईल.

3.      खाजगी बसेस वगळता खाजगी प्रवासी वाहतूक

·      खाजगी बसेस वगळता खाजगी प्रवासी वाहतूक वाहन चालक + RTO नियमानुसार अनुज्ञेय प्रवासी क्षमतेसह सुरु राहणेस परवानगी असेल.

4.    खाजगी बसेस खालील नियमांचे अटीवर सुरू राहतील.

अ.       खाजगी बसेस RTO नियमानुसार अनुज्ञेय प्रवासी क्षमतेसह सुरु राहील. यामध्ये उभे राहून प्रवासास मनाई असेल.

ब.        खाजगी वाहतूक / खाजगी बसेस वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लसीकरण करून घेणे व कोव्हीड-19 नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल.

क.      सदर आस्थापना कोव्हीड-19 नियमांचे उल्लंघन करताना आढळलेस त्यांचेवर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणणत्याच्याविरोधात र.रु.10000/- इतका दंड आकारील, असे उल्लंघन वारंवार केले जात असेल तर त्या ऑपरेटरचा परवाना कोविड-19 परिस्थिती संपेपर्यंत रद्द करण्यात येईल.

क.   रेस्टॉरंट, बार, हॉटेल

i.   सर्व हॉटेलरेस्टॉरंट आणि बार यांना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत 50 % क्षमतेसह बसून सेवा देणेस परवानगी असेल. हॉटेल आणि रेस्टॉरंट आवारामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि हॉटेलचा भाग असलेल्या अंतर्गत प्रवाशांसाठी रेस्टॉरंट आणि बार सेवा सायंकाळी 04.00 नंतरही सुरू राहतील.

ii.हॉटेलरेस्टॉरंट साठी पार्सल सेवा / घेवून जाणे सेवा (Take Away) व घरपोच सेवा (Home Delivery) सुरू राहतील.

iii.  घरपोच (Home Delivery) सेवा देणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

iv.   इमारतीमध्ये घरपोच सेवा देत असताना एका पेक्षा जास्त कुटुंबाना देणेत येणार असेल तर सदर घरपोच सेवा देणाऱ्या व्यक्तीस इमारतीमध्ये प्रवेश निषिद्ध असेल. इमारतीमधील अंतर्गत घरपोच सेवा हि इमारतीमधील स्टाफ द्वारे करणेची आहे. सदर घरपोच सेवा देणारे कर्मचारी व इमारतीमधील व्यक्तींना राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने कोव्हीड-19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.

v.      सदर नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर प्रत्येकी र.रु.1000/- इतका दंड आकारला जाई, तसेच सदर आस्थापनेकडून र. रु. 10000/- इतका दंड आकाराला जाईल. सदर कारवाई नंतरही वारंवार सदर नियमांचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जोपर्यंत कोरोना विषयक कायदा अस्तित्वात असेल तोपर्यंत सदरची आस्थापना बंद केली जाईल.

vi.   रेस्टॉरंट, हॉटेल व बार मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे

ड.     उत्पादन क्षेत्र

अ. खाली नमूद उत्पादन केंद्रे वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये सुरु राहतील

i.    या आदेशाद्वारे विहित करणेत आलेल्या अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा माल तयार करणारे कारखाने पूर्ण क्षमतेनुसार चालू राहतील.

ii.ज्या उत्पादन केंद्रांना, निर्यात पुरवठा आदेशानुसार विहित मुदतीत निर्यात पुरवठा करणे बंधनकारक आहे, अशी उत्पादन केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.

iii.   ज्या कारखान्यांमध्ये अचानक उत्पादन थांबविता येणार नाही आणि आवश्यक वेळ दिल्याशिवाय उत्पादन पुन्हा सुरु होवू शकणार नाही अशा सर्व कारखान्यांना कर्मचाऱ्याच्या पूर्ण उपस्थितीसह काम करता येईल. महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक / उद्योग विभागाने एखादे उत्पादन क्षेत्र / कारखाना सदर नियमाचा गैरवापर करून त्यांचे उत्पादन सुरु ठेवणार नाही याची खात्री करावी. तसेच सदर ठिकाणी राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोव्हीड -19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होत असलेबाबत खात्री करावी.

iv. अत्यावश्यक सेवा व निर्यात देणारी युनिट्स वगळता इतर सर्व उत्पादन क्षेत्र 50 % कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. अशा कर्मचाऱ्यांची / कामगारांची वाहतूक स्वतंत्रपणे (Isolation Bubble) करणे बंधनकारक राहील. तसेच सदर ठिकाणी राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोव्हीड- 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होत असलेबाबत खात्री करावी. या अटींची पूर्तता करणारी उत्पादन केंद्रे विविध शिफ्ट मध्ये कार्यान्वयित राहू शकतात.

ब.   सर्व कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जे कारखाने  केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या कार्यस्थळ लसीकरण या अटीमध्ये बसत असतील तर त्यांनी त्यांच्या कामगार / कर्मचारी यांचेसाठी लसीकरणाची व्यवस्था करावी.

क. कारखाने व उत्पादन केंद्रे यांना खालील अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक असेल.

i.   कारखाने व उत्पादन केंद्रामध्ये कामगारांच्या प्रत्येक प्रवेशावेळी शरीराचे तापमान तपासणे बंधनकारक असेल आणि त्यांचेकडून कोव्हीड-19 च्या नियमांचे पालन करून घ्यावे.

ii.कारखाने व उत्पादन केंद्रामध्ये काम करणाऱ्या कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आलेस. कारखाने व उत्पादन क्षेत्र व्यवस्थापनाने सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस पगारासह स्वखर्चाने विलगीकरणामध्ये ठेवावे.

iii.  ज्या कारखाने / उत्पादन केंद्रामध्ये 500 पेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी काम करीत असतील अशा कारखाने / उत्पादन केंद्र व्यवस्थापनाने स्वतःचे विलगीकरण केंद्र उभे करावे. सदर केंद्रामध्ये सर्व मुलभूत सुविधा असाव्यात आणि जर सदर सुविधा कारखाना परिसराच्या बाहेर असतील तर सर्व सुरक्षाउपाय करून कोरोना +ve व्यक्तीस इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता त्या सुविधा केंद्रापर्यंत घेवून जावे लागेल.

iv.   जर एखादा कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला असेल तर सबंधित कारखाने / उत्पादन केंद्राचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण होईपर्यंत बंद राहील.

v.      गर्दी टाळणेसाठी जेवणाच्या व चहाच्या वेळा टप्प्याटप्प्याने ठेवणेत याव्यात. एकाच ठिकाणी जेवणासाठी एकत्र येवू नये.

vi.   सार्वजनिक स्वच्छता गृहाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणेत यावे.

ड. जर एखादा कामगार / कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + ve आला तर त्यांस कामावरून न काढता त्यांस वैद्यकीय रजा देणेत यावी. सदर कर्मचारी पूर्ण वेतनासाठी पात्र राहतील.

इ) रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थ विक्रेते

·      खाद्य पदार्थ विक्रेते यांनी त्यांचे आस्थापनेच्या ठिकाणी ग्राहकांना प्रत्यक्ष खाणेसाठी देणेस प्रतिबंध असेल. पार्सल अथवा घरपोच सेवेस सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्री 08.00 पर्यंत परवानगी असेल. सदर कामासाठी आवश्यक असणाऱ्या वाहतुकीसाठी वरील मुद्दा क्र.1 ब मधून सूट असेल.

·      प्रतीक्षेत असणाऱ्या ग्राहकांना आस्थापनेपासून दूर सामाजिक अंतराचे पालन होईल अशा ठिकाणी उभे राहणेच्या सूचना द्याव्यात.

·      सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

·      स्थानिक स्वराज्य संस्था यांनी CCTV द्वारे / वैयक्तिक रीत्या सदर आस्थापनांवर लक्ष ठेवून रहावे. जर एखाद्या आस्थापनाधारक अथवा ग्राहक यांचेकडून नियमांचे उल्लंघन झालेचे निदर्शनास आलेस सबंधित आस्थापना विक्रेता व ग्राहक यांचेकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल.

·      सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना ठिकाण बंद केले जाईल.

·      स्थानिक स्वराज्य संस्था यांना असे निदर्शनास आले कि सदर आस्थापना वारंवार दंडात्मक कारवाई करूनही नियमांचे उल्लंघन करीत आहे. अशा वेळेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना ठिकाण बंद करणेत यावे.

फ. वर्तमानपत्रे / मासिके / नियतकालिके 

·        वर्तमानपत्रे / मासिके / नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी असेल.

·        वर्तमानपत्रे / मासिके / नियतकालिके यांची घरपोच सेवा सुरु राहील. स्टाल / दुकानावरील विक्री सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत सुरु राहील.

·        सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

7. करमणूक, दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटर इ.

i.   सिनेमा गृहे बंद राहतील

ii.नाट्यगृहे व सभागृहे बंद राहतील.

iii.   करमणूक नगरी / आर्केड्स (Arcades) / व्हिडीओ गेम पार्लर बंद राहतील.

iv.    जल क्रीडा, क्लब (Clubs), जलतरण तलाव स्थळे बंद राहतील.

v.      मॉल्स, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील.

vi.   सार्वजनिक ठिकाणे  / खुली मैदाने / चालणे / सायकल चालवणे यांस आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 05.00 ते 09.00 वाजेपर्यंत परवानगी असेल.

vii.  मैदानी खेळांस आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 05.00 ते 09.00 वाजेपर्यंत परवानगी असेल.

viii.                       वरील आस्थापनांमधील मालक व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

ix.    चित्रपट / मालिका / जाहिरात यांचे छायाचित्रणास खालील प्रमाणे परवानगी असेल.

अ.    ज्या चित्रिकरणास मोठ्या संख्येने कलाकार उपस्थिती राहणार असतील असे चित्रिकरण टाळावे.

ब. सदर ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीजवळ 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल.

      क. कलाकार आणि संबंधित कामगार वर्ग यांचेसाठी Quarantine Bubble तयार करणेस आलेससदर Quarantine Bubble मध्ये प्रवेश करणेपूर्वी कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सादर केलेनंतर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अटी व शर्तीवर परवानगी देणेत येईल.

      ड. सायंकाळी 05.00 नंतर उपरोक्त हालचाल प्रतिबंधित असेल.

8.  धार्मिक प्रार्थनास्थळे

अ.    सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील.

ब. धार्मिक प्रार्थनास्थळांमधील विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सामान्य नागरिकांना धार्मिक प्रार्थना स्थळांना भेटी देणेस मनाई असेल.

क. धार्मिक प्रार्थनास्थळांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

9.  केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स / व्यायामशाळा

ब.     केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स / व्यायामशाळा सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत 50 % क्षमतेसह फक्त नियोजित वेळ घेवून (only with prior appointment), वातानुकुलीत न वापरता ग्राहकांना सेवा देणेचे अटीवर सुरु राहतील. सदर आस्थापना शनिवार व रविवार पूर्णपणे बंद राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.