लग्नाचे आमिष दाखून अत्याचार,करलहट्टीच्या तरूणावर गुन्हा दाखल

0
13
सांगली : एका तरुणीशी प्रेमाच्या जाळ्यात फसवून लग्नाचे अमीष दाखवत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार ता.१२ ते १६ नोव्हेंबर दरम्यान काळ्यात घडला, पिडीतेवर अत्याचार केल्यानंतर संशयिताने लग्न करण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी कवटेमहाकांळ तालुक्यातील करलहट्टी येथील राहुल श्रीरंग ओलेकर (वय २८) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरूणी ही जिल्ह्यातीलच असून ती शिक्षणाच्या निमित्ताने शहरात रहात आहे.संशयीत राहुल ओलेकर हा तिच्या नात्यातीलच असल्याने त्याची ओळख होती. त्याने पिडीतेशी जवळीक साधत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे अमीष दाखविले.याचा फायदा घेत संशयीताने तिच्यावर बलात्कार केला.त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला.

आपली फसवणुक झाल्याचे स्पष्ट होताच पिडीतेने पोलिसांत फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी बुधवारी संशयीत राहुल ओलेकर याला अटक केली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here