रस्त्यात खड्डेच‌ खड्डे,या नेत्याने केले त्या खड्ड्यात वृक्षारोपण

0
6



डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथे पेयजल पाणी योजनेच्या गावातील पाईपलाईनचे काम सुरू आहे, त्यामुळे गावातील संपुर्ण रस्ते उकरण्यात आले आहेत. त्यामुळे तेथे रस्ते दबून खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे,अनेकवेळा सांगूनही हे खड्डे ग्रामपंचायत, संबधित ठेकेदाराकडून मुजविले जात नसल्याच्या निषेधार्ध कॉ.हणमंत कोळी व नागरिकांनी बुधवारी या खड्ड्यात वृक्षारोपण केले.

डफळापूर गाव भागात अनेक दिवसापासून पाणी योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. 





मात्र सातत्याने विरोध होत असल्याने काम थांबले जात आहे. त्यातच जेथे पाईपलाईन टाकण्यासाठी मोठी चर पाडण्यात आली आहे. त्यात माती टाकून ती तात्पुर्ती मुजविण्यात आली आहे. मात्र काही ठिकाणी या चरी दबल्याने तीन,तीन फुटापर्यत खड्डे पडले आहेत. तर अनेक ठिकाणी भराव रस्त्याच्या वर्ती आल्याने रस्त्याच्या मध्यावर चढे निर्माण झाले‌ आहेत.यामुळे सर्वच रस्ते धोकादायक झाले आहेत. त्यामुळे सातत्याने दुचाकीचे अपघात होत आहेत. 






त्याशिवाय नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.हे खड्डे मुजविण्याबाबत ग्रामपंचायत व संबधित ठेकेदार एकमेकाकडे बोट दाखवत आहेत.त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.संतप्त नागरिकांनी कॉ.हणमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली आज खड्ड्यात झाडे लावत आनोखे आंदोलन केले.






हे प्राथमिक आंदोलन आहे,तात्काळ खड्डे न भरल्यास ग्रामपंचायती समोर उपोषण करू,असा इशाराही कॉ.कोळी यांनी दिला आहे.यावेळी गंगाधर शिंदे,मुत्तुराज जैणापूरे,विजय परिट,सुनिल गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.



डफळापूर येथे गाव भागातील रस्त्यावरील खड्डे भरावेत यासाठी खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here