राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन साधेपणाने साजरा

0
14



जत,संकेत टाइम्स : येथील जत-सांगली रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात 22 वा वर्धापन दिन साधेपणाने पण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे विविध सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून फक्त ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे, तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.






यावेळी रमेश पाटील म्हणाले, गेली सतरा वर्षे मी जत तालुक्यात पक्षाचे प्रतिनिधित्व करीत आहे.तालुक्यात राष्ट्रवादी रुजवण्याचे काम प्रामाणिकपणे केले.गेल्या 22 वर्षापासून प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यात पक्ष वाढविण्यासाठी व पक्षाचे विचार रुजविण्याचे प्रामाणिक काम केले आहे.






यावेळी कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण,जेष्ठ नेते सिद्धू शिरशाड, पंचायत समिती माजी सभापती शिवाजी शिंदे,युवक तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक स्वप्निल शिंदे,विद्यार्थी तालुकाध्यक्ष पवन कोळी, वक्ता प्रशिक्षण तालुकाध्यक्ष कदरे सर, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष नामदेव कांबळे सर,रेऊर वकिल, विकास लेंगरे,प्रतापराव शिंदे सर, राजू मुल्ला, रियाज शेख, शफीक इनामदार,विजय पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.





जत येथील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यालयात 22 वा वृधापन दिन साजरा करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here