स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू | – संजय केळकर

0
सांगली : स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळकच आहे. वृत्तपत्र विक्रेता-एजंटाच्या प्रश्‍नांबाबत कामगारमंत्रीही सकारात्मक होत आहेत, लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत बैठकीचे आयोजन करू, स्वतंत्र कल्याणकारी मंडळाबाबत त्यांच्याकडे आग्रह धरू असे आश्‍वासन वृत्तपत्र विक्रेत्यांचे मार्गदर्शक, ठाणेचे आमदार संजय केळकर यांनी दिले. सांगली येथे आयोजित महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, राज्यातील सलग्न संघटनांच्या पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.

 

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेची वार्षिक सर्वसााधरण सभा व राज्यातील सलग्न संघटनांचे पदाधिकार्‍यांची बैठक सांगलीत मराठा समाज येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सुनिल पाटणकर तर प्रमुख उपस्थिती कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, सल्लागार शिवगोंड खोत यांची होती. राज्यातील 22 जिल्ह्यातील स्थानिक संघटनांचे पदाधिकारी, राज्य संघटनेचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

 

श्री केळकर यावेळी म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांचे कामाचे स्वरूप, कामाच्या वेळा, कष्ट व मिळणारे उत्पन्न याचा विचार करता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ आवश्यक आहे. ते होईपर्यंत मी पाठपुरावा करणारच. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे खास बैठक लावू. तोपर्यंत राज्य शासनाच्या विविध योजनांचा विक्रेत्यांनी लाभ घ्यावा, संघटनेच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक शहरात सेंटर शेडसाठी स्थानिक आमदारांनी मदत करावी आवश्यक तेथे मी मदत करेन.
अध्यक्ष श्री पाटणकर यांनी सर्व संलग्न संघटनांच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. श्री पाटणकर म्हणाले, कमशिन,पुरवणी भरणावळ अशा विषयांवर स्थानिक संघटनांना प्रयत्न करून प्रश्‍न मार्गी लावावेत आवश्यक तेथे राज्य संघटनेशी संपर्क साधावा. स्थानिक पातळीवर प्रसिध्द होणार्‍या सर्व दिनदर्शिकेत वृत्तपत्र विक्रेता दिन प्रसिध्दीसाठी प्रयत्न करावेत. राज्य संघटनेने घेतलेल्या सर्व निर्णयांची स्थानिक संघटना व राज्य संघटना पदाधिकार्‍यांनी समन्वय साधत ताकदीने अंमलबजावणी करावी.
कार्याध्यक्ष श्री पवार यांनी सांगितले, संघटनेने सभासद नोंदणीसाठी स्वतंत्र अ‍ॅप सुरू केले आहे. राज्यातील सर्व विक्रेता-एजंटांनी आपली सभासद नोंदणी तातडीने करावी. राज्य संघटनेच्या सतत संपर्कात रहावे. नियमितपणे जिल्हा व विभागवार बैठका व्हाव्यात. 31 मार्च 2024 अखेर सर्वांनी आपली ऑनलाईन सभासद नोंदणी पूर्ण करावी.

 

सरचिटणीस श्री सूर्यवंशी यांनी सांगितले, स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाठी राज्य संघटनेने जाहीर केलेले उपक्रम व आंदोनल प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात व मोठ्या शहरात राबवलेच पाहीजेत. आंदोलनात शंभर टक्के वृत्तपत्र विक्रेते-एजंटांचा सहभाग हवा. त्याशिवाय आपला आवाज सरकारपर्यंत पोहचणार नाही. सभासद नोंदणी, स्थानिक प्रश्‍नांबाबत समन्वयाने काम करा गरज पडेल त्यावेळी तात्काळ राज्याशी संपर्क साधा.
कोषाध्यक्ष श्री टिकार यांनी सांगितले आपले कार्यक्षेत्र मोठे आहे. कामही मोठे आहे. अशावेळी सर्वांनी राज्य संघटनेचे सभासद होणे आवश्यक आहे. आपली सभासद फी ज्या त्या वेळी भरावी. श्री टिकार यांनी यावेळी मागील वर्षाचा ताळेबंद सादर केला. सर्वांनी त्याला मंजुरी दिली.

 

विनोद पन्नासे चंद्रपुर, गोरख भिलारे पंढरपुर, चंद्रकांत घाटोळ नांदेड,आण्णासाहेब जगताप संभाजीनगर, बाबू जल्देवार नांदेड, शिवाजी वाकोडे परभणी, रमेश नागलकर नागपूर,राजू गव्हारे गडचिरोली, शाम थोराय बार्शी, रविंद्र कुलकर्णी मालेगाव, संतोष गाडेकर बुलढाणा,संतोष अशोक शिंदे,शिवलिंग मेढेगार सोलापूर, शिरभाते यवतमाळ, दत्तात्रय सरगर, सचिन चोपडे सांगली, रघूनाथ कांबळे कोल्हापूर, मारूती नवलाई आदींनी मनोगत व्यक्त केले. राज्याच्या विविध भागातील 22 हुन अधिक जिल्ह्यातील राज्य संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आभार सचिन चोपडे यांनी मानले.
सांगली जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सरगर यांच्यासह जिल्हा संघटनेचे चिटणीस  विशाल रासनकर, जिल्हा कोषाध्यक्ष अमोल साबळे, कार्याध्यक्ष दरिबा बंडगर, माजी राज्य कार्यकारणी सदस्य मारूती नवलाई, मनपा क्षेत्र उपाध्यक्ष दीपक वाघमारे, नारायण माळी, सचिन माळी, नागेश कोरे, सागर घोरपडे, नंदकुमार पोवाडे मिरज,  देवानंद वसगडे, प्रशांत साळुंखे, बाळासाहेब पोेरे, बसाप्पा पट्टणशेट्टी, दिपक सूर्यवंशी, संदिप गवळी, गणेश कटगी, सुनिल कट्याप्पा, श्रीकांत दुधाळ, मुन्ना मुल्ला, सुरेश गायकवाड, अभिजित आसगावकर, अनिल रूपनर,  निलेश कोष्टी, जावेद शेख, प्रताप दुधारे, अनिल कांबळे, हणमंत जाधव वाळवा यांच्यासह सांगली, मिरज व कुपवाड शहरातील विक्रेेते व पदाधिकार्‍यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिनाला लवकरच मान्यता
ए.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्याची पध्दत महाराष्ट्राने सुरू केली. आता देशात अनेक राज्यातही तो संपन्न होत आहे. हा दिवश राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून जाहीर करावा यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे मी पाठपुरावा करत आहे. केंद्रीय माहीती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हेही याबाबत अनुकूल असुन लवकरच त्याबाबत दिल्लीत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे 15 आक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून लवकरच घोषीत होईल.
– आम. संजय केळकर
प्रत्येक पालकमंत्र्यांकडे धरणार स्वतंत्र मंडळाचा आग्रह
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांकडे स्वतंत्र कल्याणकारी मंडळासाघी आग्रह धरण्याचा ठराव या सभेत झाला. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना भेटून निवेदन दिले जाणार आहे ही घोषणा अध्यक्ष श्री पाटणकर यांनी सर्वसााधरण सभेत केली. सर्वानुमते हा ठराव मंजुर करण्यात आला.
सभेतील ठराव पुढीलप्रमाणे
– शहराप्रमाणेच ग्रामिण भागातील विक्रेता एजंटना न्याय द्यावा
– ग्रामिण प्रश्‍न व संघटनसाठी मालेगावच्या रविंद्र कुलकर्णींच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती
-जळगाव जिल्ह्यातील तापीपूर्णामधुन प्रल्हाद महाजन राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड
-राज्य संघटनेचे 2025 चे राज्य अधिवेशन गडचिरोलीत होणार
– संघटनेच्या स्वनिधीतुन मयत वृत्तपत्र विक्रेत्याच्या वारसास  आर्थिक मदत
-राज्य संघटनेच्या बैठकीस अनुपस्थित राहणार्‍यांवर पदाधिकार्‍या होणार कारवाई
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.