जत तालुक्यात सकल मराठा समाजाचा जल्लोष 

0
Rate Card
जत : मराठा समाजाच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याने जत शहरासह तालुक्यात मराठा समाज बांधवांनी मोठा जल्लोष सुरू केला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत त्यासंदर्भाने अध्यादेश काढले आहेत. त्यानंतर गावागावात सकल मराठा समाज बांधव, भगिनी मोठ्या संख्येने एकत्र जमले.जत शहरासह डफळापूर, शेगाव,उमदी,माडग्याळ,कुंभारी, 

 

 

महापुरूषांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मिरवणुका करण्यात आल्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. डीजेच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला जातो आहे. सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले आहेत. एकमेकांना, नागरिकांना तसेच बसस्थानकातील प्रवाशांना पेढे, जिलेबी, लाडू भरवून तसेच फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात येतो आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.