आरक्षणाचा लढा अजून संपला नाही | – आ.विक्रमसिंह सावंत

0
जत : सरकारने नुकतेच मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले.पण हा लढा अजून संपला नाही. ज्यावेळी गरजवंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र व त्याचा लाभ मिळेल, प्रत्येक जिल्ह्यात समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध होतील, ज्या आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील त्यानंतरच या लढ्याचा शेवट झाला असे म्हणता येईल,अशी प्रतिक्रिया आमदार विक्रमसिंह सावंत यांनी व्यक्त केली.
आज निघालेल्या शासकीय आदेशाबाबत समाजाला जर काही शंका असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे. अशा पद्धतीचे आंदोलन छेडण्याची तसदी घेण्याची वेळ पुन्हा आंदोलकांवर येऊ नये यासाठी सरकारने तत्पर राहावे,अशी सरकारला विनंतीही आ.सावंत यांनी केले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.