जतच्या विकासासासाठी आमदार विक्रमसिंह सावंत हे काम प्रयत्नशील असतात.सातत्याने त्यांनी विधानसभा दणाणून सोडतातचं त्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद,जलसंपदा विभाग,तालुक्यातील सर्व कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सतत भेटी घेत जत तालुक्यातील नागरिकांच्या समस्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असतात.
आमदार सावंत यांनी सातत्याने वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी तालुक्यातील गावागावातील पदाधिकारी, शेतकरी,कष्टकरी,नागरिक यांच्यासोबत बैठका घेत अडचणी,समस्या मार्गी लावत विकास योजना कोणत्याही व्यत्ययाशिवाय गतीने राबविण्यासाठी कटाक्ष कायम ठेवला आहे.कायम उपलब्ध, कार्यतत्पर आमदार अशी त्यांची तालुक्यात ओळख आहे.