जतचे विकासाभिमुख नेतृत्व- आ. विक्रमसिंह सावंत

0
अल्पावधीत आपल्या विकासकार्यांच्या जोरावर सर्वसामान्य जतकरांच्या गळ्यातील ताईत बनलेले आ.विक्रमसिंह ( दादा ) सावंत जतच्या विकासासाठी थेट यंत्रणेशी भिडणारे नेते म्हणून राज्यात ओळख निर्माण केली आहे.यश, अपयशाची पर्वा न करता राज्याचे माजी मंत्री कै. पतंगराव कदम यांच्या स्वप्नातील जत बनविण्यासाठी राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या खांद्याला खांदा लावून आ. विक्रमसिंहदादा सावंत हे जतच्या विकासासाठी प्रामाणिकपणे अहोरात्र झटत आहेत. विकासकामे करत असताना विरोधकांच्या टिकेलाही त्यांनी सौजन्याने विकासकामे खेचून आणत आपल्या कामातून उत्तर दिले आहे.
★  *जनतेतील प्रभावी नेतृत्व*
२००७, २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमदादांना जरी पराभव स्विकारावा लागला तरी त्यांचा प्रभाव कमी न होता त्यांचा प्रभाव वाढतच गेला. मोदी लाटेतही विक्रमसिंहदादा यांचा प्रभाव कायम राहिला. त्यांना दोन नंबरची ५५ हजार मते मिळाली होती हे विशेष.२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत विक्रमसिंहदादा हे उमदी जिल्हा परिषद गटातून विजयी होत जिल्ह्याच्या सभागृहात पोहचले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही त्यांचा विजयी पताका कायम राहिला. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम करत जतच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जतकरांनी विक्रमसिंहदादा सावंत यांना विक्रमी ३५ हजाराहून अधिक मतांनी विजयी केले. पराभवाने खचून न जाता जतचा विकासाचा एकमेव अजेंडा हाती घेतलेल्या विक्रमसिंहदादा यांना पराभवही खचवू शकला नाही उलट पराभवच्या काळातही त्यांचे वाढत असलेल्या जनमताने त्यांच्यावर टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात मात्र झणझणीत अंजन घातले.

 

★ *संघर्ष जतच्या पाण्यासाठी*
दुष्काळी जत तालुक्याचा कायापालट करायचा असेल,जत तालुका सुजलाम, सुफलाम  करायचा असेल तर जतला पाणी आले पाहिजे यासाठी आ. विक्रमसिंहदादा सावंत यांचा कायम संघर्ष, लढा व पाठपुरावा सुरू असतो.जत तालुक्यात म्हैसाळच्या योजनेतून तर पाणी आलेच पाहिजेच त्याचबरोबर शेजारील कर्नाटकातून तुबची बबलेश्वर योजनेतून जत पूर्व भागातील ६४ गावांना सायपण पद्धतीने पाणी येवू शकते यासाठी त्यांचा कायम आग्रह आहे व त्याचा पाठपुरावा सुरू आहे.
दुष्काळी जतला कर्नाटकातून पाणी मिळावे यासाठी आ.विक्रमसिंहदादा सावंत हे आमदार नसतानापासून झटत आहे. आ.विक्रमसिंहदादा सावंत यांनी त्यांच्या वाढदिनी अनावश्यक खर्चाला  फाटा देत वाढदिनी पाण्यासाठी शेतकरी मेळावे, पाणी परिषदा घेतल्या इतकेच नव्हे तर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील जलसंपदा मंत्र्यांना एकाच व्यासपीठावर आणले. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यात, जलसंपदामंत्र्यात, प्रशासनात यशस्वी चर्चा घडवून आणली. दोन्ही राज्यात आंतरराज्य करार झाल्यास जत पूर्व भागाला पाणी मिळू शकते यासाठी आजही विक्रमदादा प्रयत्नशील आहेत.कर्नाटकातील तुबची बबलेश्वर योजनेला गाजर म्हणून विरोधकांनी हिणवले तेच विरोधक याच योजनेसाठी पाठपुरावा करताना दिसले यातच आ.विक्रमसिंह सावंत यांची दूरदृष्टी दिसुन येते. कर्नाटकमधून पाणी आणण्यास विरोधक खोडा घालत असले तरी विक्रमदादा यांनी मात्र आपला पाठपुरावा सोडलेला नाही, सोडणार नाहीत. एक ना एक दिवस आ. विक्रमसिंह सावंत जतला पाणी आणतील याचा आम्हाला विश्वास आहे.

 

★ *कोरोना योद्धा आ.विक्रमसिंहदादा सावंत*
मागील दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळात आ. विक्रमसिंह सावंत यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अविरत कार्य केले. जत तालुक्यातील कोरोना केअर सेंटर, ऑक्सिजन प्लॅन्ट उभारले व अनेकांचे जीव वाचवले. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विक्रम फौंडेशनच्या माध्यमातून गरजवंतांना तात्काळ मदत पोहचवली इतकेच नव्हे तर प्रशासनाही सर्वतोपरी सहकार्य केले. हे सर्व करत असताना आ. विक्रमदादा सावंत यांनी त्याचा कधी गाजावाजा केला नाही.

 

Rate Card
★  *जतच्या विकासासाठी कटिबद्ध नेतृत्व*
कोरोनाच्या या कठीण काळातही आ. विक्रमसिंहदादा सावंत यांनी जतच्या विकासासाठी भरीव निधी खेचून आणला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात विकासकामे त्यांनी हाती घेतले आहेत.  जतच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आ. विक्रमसिंहदादा सावंत हे भविष्यातही जत तालुक्याला भरीव निधी आणतील व जतचा चेहरामोहरा बदलतील यात शंका नाही.
■ *कदम साहेबांच्या स्वप्नातील जत बनविण्याचा संकल्प*
राज्याचे माजी मंत्री स्व.पतंगराव कदम साहेब व जतचे आपुलकीचे, जिव्हाळ्याचे नाते होते. स्व. पतंगराव कदम साहेब यांनी जतला कायम झुकते माप दिले. जत तालुका मी दत्तक घेतल्याचे ते जाहीरपणे सांगत. जत तालुका विकासात सर्वात पुढे राहिला पाहिजे, जतमधील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे हे स्व.पतंगराव कदम साहेब यांचे स्वप्न होते.स्व.पंतगराव कदम साहेब यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प जतचे आमदार विक्रमसिंहदादा सावंत यांनी केला आहे. त्यांचा हा संकल्प पूर्ण होवो हीच वाढदिनी शुभेच्छा !
■ हणमंतराव बाबर
प्रतिनिधी,संकेत टाइम्स

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.