जत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या स्थिर,मुत्यू संख्याही कायम

0
11



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव अद्याप कायम असून कोरोना नव्या रुग्णाचा आकडा स्थिर आहे.तर मुत्यू संख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र कायम आहे. गुरूवारी पुन्हा दोघाचे मुत्यू झाले आहेत.

तर 112 जण कोरोना मुक्त झाले आहेत.920 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.






गुरूवारचे नवे रुग्ण,जत 6,वळसंग‌ 2,पाच्छापूर 1,रामपूर 1,निगडी बु.1,देवनाळ 1,संख‌ 1,आसंगीजत 2,पांढरेवाडी 1,खोजानवाडी 2,सिंदूर 1,जा.बोबलाद 2,माडग्याळ 7,सनमडी 2,सोरडी 2,टोणेवाडी 2,येळवी 3,उमदी 3,उटगी 1,निगडी बु.2,वाळेखिंडी ‌2,सिंगनहळ्ळी 3,कोसारी 3,अंत्राळ 1,गुळवंची 6,कुंभारी 2,करेवाडी 2,डफळापूर 1,बाज‌ 1,असे 64 नवे रुग्ण आढळून आले आहेत.





दरम्यान जिल्ह्यात गुरूवारी दिवसभरात 948 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.त्यात महापालिका क्षेत्रात 119 नवे रुग्ण आढळून आले आहेत.जिल्ह्यातील 22 कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे.तब्बल 815 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 9129 रुग्ण उपचाराखाली आहेत.

जिल्ह्यात म्युकर मायकोसिस ; गुरूवारचे नवे रुग्ण 2 आढळले आहेत.यामुळे एकूण रुग्ण -231 झाली असून 14 जणाचा मुत्यू झाला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here