तालुक्यातील विविध मागण्यासाठी रिपाइंकडून निवेदन

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील विविध प्रश्नाच्या मागण्यासाठी रिपाइं कडून जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांना निवेदन देण्यात आले.

मराठा समाजातील बरीचशी जनता आर्थिक परिस्थितीने गरिबीची असल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याने खाजगी मेडिकल दुकानदार व लॅबरोटरी वाले गोरगरिबांना जादा दराने आकारणी करून लुटीचा प्रकार चालू आहे.तरी औषधे तपासणी शासनाच्या दरात मिळावेत कोरोना वरील लसीचे ऑनलाईन बुकिंग करून घेण्याची पद्धत ग्रामीण भागातील बऱ्याचशा लोकांना अवगत नसल्यामुळे कोरोना पासून बचाव करण्यासाठी शासन स्तरावरील निर्णय घेऊन कोरणा चे लसीकरण घरोघरी जाऊन करावे.

तालुक्यातील बाज ग्रामपंचायतीकडे गेली पन्नास वर्षे झाले अनुसूचित जाती चे सरपंच पदासाठी आरक्षण मिळालेले नाही,ते मिळावे लोहगाव गावात कार्यरत असणाऱ्या आरोग्य सेविका श्रीमती बाबर या मागासवर्गीय कुटुंबांना औषध गोळ्या देताना व तपासताना वेगळी वागणूक देतात त्यांच्यावर त्यांची चौकशी करून कारवाई व्हावी तसेच वायफळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती दामसे माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती देत नाहीत,शिवाय ग्रामपंचायत मध्ये येणारा जाणाऱ्या शेतकरी व नागरिकांना उद्धट व अरेरावीची भाषा वापरतात त्यांची चौकशी होऊन कारवाई व्हावी.Rate Cardत्याचबरोबर जत शहरातून जाणारा विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरील असलेली राजकीय बडी मंडळी व बडी धेंडे यांची अतिक्रमणे दूर करुन रस्ता रुंद करावा व शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहराबाहेरून रिंग रोड बायपास रस्ता करावा हा रस्ता सध्या राष्ट्रीय महामार्ग झाला आहे विजापूर गुहागर असे या राष्ट्रीय महामार्गाचे नाव असून जत शहरातून जाणारे या रस्त्याची रुंदी ही 24 मीटर म्हणजे 80 फूट इतकी प्रस्तावित असताना या महामार्गाचे जत शहरातील रस्त्याचे काम सुरू करत असताना या रस्त्याच्या प्रस्तावित 24 मीटर आंतरा ऐवजी रस्त्याची रुंदी कमी केली आहे. शिवाय अतिक्रम धारकांना यापुर्वीच नोटिसा दिल्या आहेत.

रस्त्याचे दोन्ही बाजूला असलेल्या गटारी वर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत ती अतिक्रमणे ताबडतोब दूर करावीत,रस्ता कामाची उच्चस्तरीय समिती नेमून समितीमार्फत चौकशी करावी अशा मागण्यात करण्यात आल्या आहेत.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे,किशोर चव्हाण,विनोद कांबळे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुभाष कांबळे,तालुका सरचिटणीस प्रशांत ऐदाळे,शहराध्यक्ष संजय विलास कांबळे, तालुका उपाध्यक्ष राहुल चंदनशिवे,मातंग आघाडी तालुका उपाध्यक्ष सुनील गुळे, लोहगाव ग्रा.प.सदस्य दीपक मागाडे उपस्थित होते.जत तालुक्यातील रिपाइंकडून विविध मागण्यासाठी निवेदन प्रांताधिकारी प्रंशात यांना निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.