बैलगाडी शर्यतीचा थरार..नमो चषकमध्ये महाराष्ट्रातील पहिलीच बैलगाडी शर्यत कुठे झाली वाचा सविस्तर..

0

नमो चषकमध्ये महाराष्ट्रातील पहिलीच बैलगाडी शर्यत

जत:नमो चषक अंतर्गत महाराष्ट्रातील पहिली बैलगाडी मैदान तालुक्यातील बाज गावी संपन्न झाले. जत केसरीच्या या मैदानात हिंदकेसरी हारण्या व तांबडा हारण्याच्या जोडीने बाजी मारली. भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी मैदान भरविले होते.लाखांवर प्रेमींची गर्दी, प्रचंड चुरसीत बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवला.
यावेळी तम्मनगौडा रवीपाटील म्हणाले की, जत तालुक्यातील प्रत्येक गावात, शिवारात पाणी पोहोचले पाहिजे, तालुका दुष्काळमुक्त झाला पाहिजे, हे आपले स्वप्न आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते १९ फेब्रुवारीला विस्तारित म्हैसाळ योजनेचे भूमिपूजन होईल. त्यानंतर पूर्व भागाचे नंदनवन होईल. दरवर्षी जत केसरी स्पर्धा भरविण्यात येतील, असे रविपाटील म्हणाले.

Rate Card

भाजपने महाराष्ट्रभर नमो चषक विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. मात्र नमो चषक अंतर्गत बैलगाडी व घोडागाडी शर्यंतीचे आयोजन करणारा जत हा राज्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ ठरला आहे.

 

जनरल अ गटातील 1 लाख बक्षीसाचे मानकरी हिंदकेसरी हरण्या & तांबडा हरण्या ही जोडी ठरली. बंडा भाऊ खिल्लार हे गाडीवान आहेत.जनरल ब गट निकाल: प्रथम: संतोष गलांडे- पाटील डेअरी,गाडीवान अनिल बंडगर द्वितीय : लाट बैज्या बेडग तलाठी, गाडीवान बंडा खिलारे तृतीय :आबा पुकळे, लोकरेवाडी गाडीवान उमराव आदत गट: प्रथम -अनिल बंडगर द्वितीय -अनिल दादा पुणेकर तृतीय -शहानुर लंगरपेठ

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.