कुंभारी परिसरात बिबट्याची भिती कायम

0
जत : कुंभारी परिसरात बिबट्या मुक्त संचार करत असून दररोज जागा बदलत असल्याने वनविभागाचे अधिकारीही चक्रावले आहेत.कुंभारी परिसरात गेले सात दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून परिसरातील शेतकरी व गावातील नागरिक बिबट्याच्या धास्तीने भयभीत झाले आहेत.कुंभारी येथील माजी पं.स.सदस्या अर्चना नाथा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जत वनविभागाचे अधिकारी प्रविण पाटील यांची भेट घेऊन त्यांना बिबट्याचा बंदोबस्त करण्याची लेखी मागणी करूनही वनविभाग बिबट्या प्रकरणाकडे गांभीर्याने पहाण्यास तयार नाही.

 

कुंभारी परिसरात मुक्तपणे बिबट्या मादी ही आपल्या तीन बछड्यासह फीरत असून याचा धसका परिसरातील नागरिकांनी घेतला आहे.शेतकरी तर आपल्या शेतात जाण्याचे नाव काढेनात.आज रविवारी सायंकाळी प्रकाश जाधव या मेंढपाळास बिबट्याचे दर्शन झाले आहे.हा मेंढपाळ कुंभारी येथील डी.बी.माळी यांच्या मळ्याजवळील परिसरात मेंढरे चारण्यास गेला असताना त्याला बिबट्याचे दर्शन झाले होते.
त्यामुळे तो आपली मेंढरे घेऊन परत फिरला एका महिलेनेही स्व:ता बिबट्या पाहील्याचा दावा केला आहे.गेले सात दिवस होऊन गेलेतरी बिबट्याला पकडण्यात वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी अपयशी ठरले असून दि.१२ फेब्रुवारीपर्यंत वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त केला नाहीतर त्यानंतर कुंभारी येथील शेतकरी जत वनक्षेत्रपाल कार्यालयासमोर धरणे धरतील असा इशाराही अर्चना पाटील यांनी दिला आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.