प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवू ; विष्णू चव्हाण

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत ते प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघांचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जत पंचायत समितीचे उपसभापती विष्णू चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी उपसभापती चव्हाण यांनी शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली.जत तालुका प्राथमिक शिक्षक संघांचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर ,जिल्हा उपाध्यक्ष जैनुद्दीन नदाफ, शिवाजीराव सावंत, तालुका उपाध्यक्ष भगवान वाघमोडे, भालचंद्र गडदे ,रावसाहेब वाघमोडे तालुका  सरचिटणीस गुंडा मुंजे,तालुका कार्याध्यक्ष तानाजी टेंगले यांनी उपसभापती चव्हाण यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. 

तालुक्यातील शिक्षकांची सातव्या वेतन आयोग पडताळणी कामी पाठपुरावा करावा, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर जि.प. शाळा इमारत डागडुजी व शालेय परिसर स्वच्छ करून मिळाव्यात, जिल्हा परिषदच्या सर्व शाळांना विद्युतीकरण व शाळा संरक्षण भिंत बांधावी, शालेय शौचालय, मुताऱ्या व पाण्याची सोय करावी,


Rate Card


जिल्हा परिषदच्या सर्व दवाखान्यातील, ‘रुग्ण कल्याण’ समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून प्राथमिक शिक्षकांचा एक सदस्य घ्यावा,पंचायत समितीच्या मध्यामातून शाळा निर्जंतुकीकरण साहित्य (किट)शाळांना मिळव्यात अशी मागणी यावेळी शिष्टमंडळानी उपसभापती चव्हाण यांच्याकडे केली.


जत‌ पंचायत समितीचे उपसभापती विष्णू चव्हाण यांच्याकडे शिक्षकांच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.