जत: सनमडी येथे एकावर तरसाने हल्ला केला.या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. व्यंकटेश नरुटे असे जखमीचे नाव आहे. या वृत्ताला जत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.सनमडी येथील नरुटे हे दोन दिवसांपूर्वी रात्री व्यंकटेश नरूटे सनमडी येथील माडग्याळ रस्त्यावरून मोटरसायकलवरून निघाले असता, रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या तरसाने नरुटे यांच्यावर अचानक हल्ला केला.अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर नरुटे हे मोटरसायकलवरून खाली पडले.
ते खाली पडताच तरसाने तेथून पळ काढला, म्हणून ते बचावले.नरुटे यांना तातडीने जत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर त्यांच्या पथकाने घटना घडलेल्या ठिकाणची पाहणी केली केव्हा त्यांना तेथे तरसाच्या पायाचे ठसे मिळून आले.