माडग्याळ : जत तालुक्यातील सर्वाधिक टंचाईची झळ पोहचलेल्या माडग्याळ परिसरात आता कृष्णामाई पोहचली आहे.१८ किलोमीटरचा प्रवास करत पाणी आता दोड्डनाला तलावात पोहचले आहे.हे यश आम्ही केलेल्या प्रयत्नाचे असल्याचे मत जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी व्यक्त केले.
म्हैसाळ सिंचन योजनेतून मुख्य कँनॉलला मायथळ पासून पाईप लाईन काढून माडग्याळ,व्हसपेठ,गुड्डापुर,सं ख,
अंकलगी,कुलाळवाडी,गोंधळेवाडी , आसंगी हे तलाव भरून ओढ्या,नाल्यातून पाणी सोडावे ही मागणी सातत्याने शेतकऱ्याकडून होत होती.जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी खासदार संजयकाका पाटील,माजी आमदार विलासराव जगताप,तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,जिल्हाधिकारी व म्हैसाळ योजनेचे अधिकारी यांच्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.याला यश मिळते 17 डिंसेबरला मायथळ कालव्यातून केलेल्या पाईपलाईनमधून माडग्याळ ओढ्यात पाणी सोडण्यात आले होते.
गेल्या अडीच महिन्यात सतत पाणी सोडल्याने हे पाणी पुढील जवळपास 15 तलाव व बंधारे भरून 18 किमी प्रवास करत दोड्डनाल्यात या मध्यम प्रकल्पात पोहचले आहे.यामुळे या परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.येत्या 5 ते 6 महिन्यात व्हसपेठ,गुड्डापुर,आसंगी,गोंधळे वाडी,संख,कुलाळवाडी,अंकलगी तलावातही हे पाणी पोहचविले जाणार आहे.म्हैसाळच्या अधिकाऱ्यांकडून त्याबाबत तयारी सुरू आहे.या परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.अंकलगी योजनेला मिळालेला २६ कोटीचा निधीमुळे हा परिसर आता पाणीमय होणार निश्चित आहे.त्याचबरोबर म्हैसाळ विस्तारितच्या माध्यमातून जत पुर्व मधिल ६५ गावे येत्या एक-दोन वर्षात ओलिताखाली येणार असल्याचे जमदाडे यांनी सांगितले.
पाणी पोहल्याचे अनेकांचे मनसुबे फसले
म्हैसाळ योजनेतून आम्ही या भागाला पाणी देता येते म्हणून प्रयत्न करत असताना काही जणांनी माडग्याळला पाणी येत नाही म्हटले,आता दोड्डनाला भरला.व्हसपेठ तलावात पाणी येत नाही म्हटले आता संखं,अंकलगी ,गुड्डापूर,गोंधळेवाडी तलाव भरणार असे मत प्रकाश जमदाडे यांनी यावेळी व्यक्त केले.
जत : अडीच महिन्यापुर्वी खा.संजयकाका पाटील,विलासराव जगताप, प्रकाश जमदाडे यांनी बैठक घेत येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.




