बेवनूर येथे विवाहितेचा संशयास्पद मुत्यू | मृत्तदेहाची परस्पर विल्हेवाट;घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

0जत,संकेत टाइम्स : बेवनूर ता.जत येथील विवाहिता ऋतुजा अमोल सरगर(वय 19)यांचा संशयास्पद मुत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे विवाहितेच्या मृत्तदेहाची परस्पर विल्हेवाट लावत अत्यविंधी केला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडीलांनी घातपाताचा संशय व्यक्त‌ करत पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून पती अमोल आप्पा सरगर (रा.बेवनूर) यांच्या विरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,बेवनूर येथील अमोल सरगर व बुध्याळ,ता.सांगोला,जि.सोलापूर येथील ऋतुजा लवटे यांच्याशी एक वर्षापुर्वी झाला आहे.विवाहानंतर पती पत्नी दोघे राजकोट(राजस्थान) येथे राहण्यास गेले होते.काही दिवसानंतर पती अमोल सरगर यांने पत्नी ऋतुजा हिला दुकान घालण्यासाठी 25 जून 2020 ते 8 जून 2021 पर्यत माहेरून दोन लाख रूपये आणण्यासाठी शाररिक,मानसिक त्रास देऊ लागला होता,काही दिवसापुर्वी दोघे बेवनूर येथे आले होते.दरम्यान येथेही पती अमोल वडिलाकडून पैसे आणण्यासाठी छळ करू लागला होता,अखेर मंगळवार ता.9 रोजी ऋतुजा हिने गळपास लावून आत्महत्या केली होती.यांची माहिती पोलीसांना न देता ऋतुजा हिचा मृत्तदेह खाली उतरवून अत्यसंस्कार केले होते.

Rate Card

अखेर बुधवारी मयत ऋतुजा हिचे वडील गोरख बाबासाहेब लवटे (रा.बुध्याळ,ता.सांगोला) यांनी पोलीसात धाव घेत‌ पती अमोल सरगर यांच्या जाचाला कंटाळूनच ऋतूजा हिने आत्महत्या केल्याचे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी भादविस कलम 304(ब)497(अ),176 अन्वेय गुन्हा दाखल केला आहे. पती अमोल सरगर अन्य काही नातेवाईकांना पोलीसानी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान मयत ऋतुजा हिचे वडिल गोरख लवटे यांनी मुलींचा घातपात झाला असून पती अमोल विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक कपडेकर करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.