खलाटीत मका,इतर बियाणे प्रात्यक्षिकास प्रारंभ

0



डफळापूर, संकेत टाइम्स : खलाटी (ता.जत) येथे महाराष्ट्र शासन क्रषी विभागा मार्फत खरीप हंगामध्ये तयारीसाठी मका व इतर बियाणाच्या बीज प्रक्रियेच्या प्रात्यक्षिकास प्रारंभ करण्यात आला. 






शासनाच्या एक गाव एक वाण या संकल्पनेअंतर्गत (पीपीपी) धोरणानुसार एकरी 60 क्विंटल मका उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक उपविभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ,तालुका कृषी अधिकारी हणमंतराय मेडीदार,मंडल कृषी अधिकारी बी.बी.बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येत आहे.





यावेळी कृषी सहाय्यक धनाजी सुतार म्हणाले,या खरीप हंगामात तालुक्यात साधारणपणे मका,ज्वारी,बाजरी, भुईमुग,त्रणधान्य व कडधान्य पिके घेण्यात येत असून, या सर्व प्रकारच्या बियाणे पेरण्यापुर्वी बियाण्यास रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करावी.बीज प्रक्रियेमुळे बियाणाची  उगवण चांगली होते.किड व रोगास प्रतिकारक क्षमता तयार होऊन रासायनिक औषधावरील खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते. 

Rate Card





मका बियाणेस रासायनिक बीज प्रक्रियेकरीता एक एकरासाठी 8 किलो बियाणे,गावचो 3 मिली प्रति किलो ,वापरून सावलीत सुकवून जैविक बीजप्रक्रियेसाठी अझोटोबँक्टर 200 ग्रँम,पीएस बी 200 ग्रँम व ट्रायकेाडर्मा 30 ग्रँम किलो बियाण्यास चोळावे व पेरणी करावी.यावेळी खलाटी येथील शेतकरी भिमराव मोरे,अरविंद कदम,सचिन जाधव,श्रीधर मोरे,लक्ष्मण मोरे,गणेश मोरे आदी शेतकरी उपस्थित होते.



खलाटी ता.जत येथे खरीप हंगामध्ये तयारीसाठी मका व इतर बियाणाच्या बीज प्रक्रियेच्या प्रात्यक्षिकास प्रारंभ करण्यात आला. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.