जत : भारत देशामध्ये लोकसभा पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले असून आचारसंहिता लागू झाली आहे.देशभरात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारी चाचपणीत व उमेदवार यादी जाहीर करण्यामध्ये व पळवा पळवी मध्ये वातावरण सर्वत्र गुंतागुंतीची झाली आहे. कोण उमेदवार कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार आहे हे सर्वसामान्य जनतेला कळेनासे झाले आहे उद्या आणि परवा त्याच पक्षात असेल अशी कोणतीही शक्यता नाही.
त्याचबरोबर मीडियावाले चॅनल आपापल्या परीने टीआरपी वाढवण्यासाठी किंवा सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी येणाऱ्या मतमोजणीचा ओपिनियन पोल दाखवण्याचे स्पर्धाओं चालू झाले आहे.प्रत्येकाचा ओपन वेगवेगळ्या जागा दाखवतो आचारसंहिता चालू असल्यामुळे याचा परिणाम सर्व सामान्य मतदारांच्यावरती होऊ शकतो त्यामुळे निवडणूक आयोगाने ओपनीयन पोल दाखवण्यावर ताबडतोब बंदी घालावी व आदर्श आचारसंहितेचा वापर करावा.