जत : जत तालुक्यातील अचकनहळ्ळी येथील योगेश कोळी (२६) याने कर्नाटकातील लोकापुर येथे झाडास गळफास घेऊन आत्महत्या केलं. घरगुती कारणावरून त्यांनी आत्महत्या केली असण्याचा, असा अंदाज कर्नाटक पोलीसांनी व्यक्त केला.मूळ जत तालुक्यातील अचकनहळ्ळी येथील योगेश कोळी याचा दहा चाकी ट्रक आहे.
शनिवारी तो कर्नाटकातील लोकापूर येथील सिमेंट कंपनीत गेल होता. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सिमेंट कंपनीजवळील झाडाला लटकताना आढळून आला.गेल्या वर्षीच त्याचा विवाह झाला होता. योगेशच्या आत्महत्येबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहे. अधिक तपास कर्नाटक पोलिस करीत आहेत