बेकायदा जमाव; उमदीतील आठ जणांवर गुन्हा

0
जत : उमदी (ता. जत) येथे विजापूर रस्त्यावरील अमोघसिद्ध मंदिरजवळ शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मलकरसिद्ध मंदिराच्या देणगीच्या वादातून हाणामारीचा प्रकार घडला.बेकायदा जमाव जमवून दंग केल्याबद्दल जिल्हाधिकायांचा बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रवींद्र महादेव शिवपुरे, प्रकाश महादेव शिवपुरे, मल्ला मदगडा साटगी, ओयाप्पा कल्लाप्या शिरगट्टी, तत्काप्पा कल्लाप्पा शिट्टी व अनओळखी तीन इसम (सर्व रा. उमदी ता. जत) अरी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

उमदी येथील मलकारसिद्ध मंदिराच्या देणगीवरून देकायदेशीर जमाव जमवून दंग करत मारमारीच प्रकार घडला. याप्रकरणी कलम १६९,१६०,१८८ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ प्रमाणे सरकारतर्फ पोलिस शिपाई महादेव रावसाहेब महसनाळ यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार वरील आठ जणांवर बेकायदा जमाव जमवून दंगा केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.