गुड्डापूर : प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेले गुड्डापूर येथे पाणी टंचाई वाढली आहे.त्यामुळे भाविकांनी पाणी जपून वापरावे,असे आवाहन श्री दानम्मादेवी देवस्थान ट्रस्ट, गुडडापुर यांच्याकडून करण्यात आले आहे.तसे निवेदन जाहिर केले आहे.
निवेदनात सर्व सदभक्तांना नम्र विनंती करण्यात येते की,श्री दानम्मादेवी देवस्थान श्री क्षेत्र गुड्डापुर परिसरात तीव्र उन्हाळा तडाखा बसत आहे.त्यामुळे गुड्डापुर येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेले आहे. या परिस्थितीत टँकरने सुध्दा पाणी पुरवठा करणे अशक्य झालेले आहे.त्यामुळे या परिस्थितीत सर्वांनी परस्थितीचे गांभीर्य
ओळखून काटकरसरीने पाण्याचे वापर करावा,पुढील दोन महिने स्थिती अशी राहणार असल्याने करावे सर्वांनी पाणी जपून वापरावे,असेही ट्रस्टकडून सांगण्यात आले.