रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भिषण अपघात ; चौघाचा मृत्यू,१० जखमी

0
नागज : रत्नागिरी नागपूर महामार्गावर ऊसतोड मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघा कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.मयत सर्व कामगार हे मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगी व शिरनांदगीतील आहेत.घटनेची माहिती मिळताच चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी घटनास्थळी भेट देत नातेवाईकांची भेट घेत आधार दिला आहे.

 

 

अधिक माहिती मंगळवेढा तालुक्यातील चिक्कलगी शीरनांदगी गावातील ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी काम करत होते.नुकताच गळीत हंगाम संपल्याने या भागातील ऊसतोड मजूर ट्रॅक्टरमध्ये सर्व प्रापंचिक साहित्य घेऊन मुलाबाळास सोमवारी पहाटेच्या सुमारास मंगळवेढाकडे निघाले होते.त्यादरम्यान रत्नागिरी नागपूर महामार्गावरील नागज फाटा येथे ट्रैक्टर रस्त्याकडेला थांबवून थांबले होते.

 

दरम्यान पाठीमागून आलेल्या भरधाव मालवाहतूक ट्रकने ट्रॅक्टरच्या ट्रॉलींना धडक दिल्याने ट्रॅक्टर मध्ये अर्ध झोपेत असलेले ऊसतोड मजूर ट्रॅक्टर बाहेर फेकले गेले.त्यात चार जणाचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
मृतामध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वय 30 रा.शिरनांदगी,जगमा तम्मा हेगडे वय 35, दादा आप्पा ऐवळे वय 17,निलाबाई परशुराम ऐवळे वय 3 रा.चिक्कलगी यांचा जागीच मृत्यू झाला व आणि 11 जखमी आहेत जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले.

 

Rate Card
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो त्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते.दिवाळीपासून चिक्कलगी व शीरनांदगी भागातील हे मजूर ऊसतोडणीसाठी शिरोळ येथील गुरूदत्त कारखान्याकडे काम होते.हंगाम संपल्याने घराकडे परतत असताना नियतीने ‌त्यांच्यावर घाला घातला आहे.

 

 

ट्रॉलीतील साहित्य रस्त्यावर विकुरले
ट्रॉलीत मजूराचे सर्व साहित्य होते.ट्रॉलीला धडक दिल्याने सर्व साहित्य रस्त्यावर पडले होते.मृत्त झालेल्यामध्ये तरूण मुलगा,लहान मुलगीचा समावेश आहे.अपघातचे वृत्त समजताच चिक्कलगी व शिरनांदगीत शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.