बिडकीन : मराठवाड्यात उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे. मृत मुलगा ३० वर्षीय आहे. जैनपूर मध्ये फिरायला गेला असताना त्याला अचानक चक्कर आली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.गणेश कुलकर्णी हा ३० वर्षीय मुलगा मित्र आणि नातेवाईकांसोबत संध्याकाळी चारच्या सुमारास फिरायला गेला होता. यावेळी तो अचानक चक्कर येऊन पडला. त्याच्या नाका-तोंडून फेस येऊन तो जागीच मृत पावला.
होळी होताच राज्यात उन्हाचा पारा तीव्र झाला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच सूर्य आग ओकत असल्याने दुपारी उन्हात बाहेर पडणे अनेकांना कठीण झाले आहे.गणेश कुलकर्णी यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे, तर शवविच्छेदन अहवाल तयार झाल्यानंतर याबाबत खात्रीशीर माहिती मिळेल, अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकारी प्रणिता मात्रे यांनी दिली आहे.