जत : जत शहरातील सर्वात मोठ्या व भव्य अशा ५० एकर एनए क्षेत्रातील रो हाउसच्या प्रकल्प सोहळ्याचे उद्घाटन शुक्रवारी दि.५ एप्रिल रोजी होणार आहे.श्री लक्ष्मी डेव्हलपर्स व श्री लक्ष्मी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.राजेंद्र कोळेकर सर यांच्या संकल्पनेतून भव्य रो हाऊसचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे.श्रीगुरूदेव आश्रम, बालगांवचे प.पू.अमृतानंद महास्वामीजी आणि ह.भ.प. तुकारामबाबा महाराज यांच्याहस्ते हा सोहळा होणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला संयोजक पै. सचिन बोरकर, रामदास दोलतडे, दिनेश सोळगे, योगेश पाटील, चौरंग पाटील, प्रमोद मेटकरी, कृष्णा शेंडगे, प्रा.घनश्याम चौगुले,दिलीप बिराजदार, राजू दुधाळ,लक्ष्मण पवार आदी उपस्थित होते.श्री लक्ष्मी डेव्हलपर्सच्या वतीने आर. के. नगर जत येथे भव्य, सुंदर आणि उत्कृष्ट असा रोहाऊसचा प्रोजेक्ट साकार होत आहे. या सोहळ्याला दिव्यसानिध्य व शुभाशिर्वाद श्रीगुरूदेव आश्रम, बालगांवचे प .पू.अमृतानंद महास्वामिजी आणि ह.भ.प. तुकारामबाबा महाराज यांचे लाभणार आहे.तरी नागरिकांनी आर. के. नगर जत (आर. आर. कॉलेजच्या जवळ) MSEB च्या पाठीमागे कंठी रोड, जत, या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.