दरिकोणूरमध्ये भांडणे सोडविण्यासाठी बोलवून एकास मारहाण

0जत,संकेत टाइम्स : दरिकोणूर ता.जत येथे भांडणे मिटविण्यासाठी बोलवून मारहाण करून कृष्णा बिराप्पा व्हनमाने (वय 30) यांना जखमी केल्याप्रकरणी तंटामुक्ती अध्यक्षासह आठ जणाविरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेली अधिक माहिती आहे, दरिकोणूर येथे राहणारे कृष्णा व्हनमाने,सोमाण्णा व्हनमाने यांच्यातील वाद मिटविण्यासाठी आलेले तंटामुक्ती अध्यक्ष पापा तुकाराम मलमे व रघूनाथ महादेव मलमे यांनी कृष्णा यांना थोबाडीत मारून शिवीगाळ केली.Rate Cardत्यानंतर एका टेम्पोतून आलेले अमिन अलाबक्ष शेख,आजरुद्दीन लालासाहेब पठाण,इंमजाज इमान शेख,सोहेल आयुब शेख व सलमान कादर पठाण सर्वजण रा.दरिकोणूर यांनी रस्त्यात आडवत व ग्रामपंचायती समोर रघूनाथ नागणेसह सर्वांनी वाईटवगाळ शिवीगाळ करून प्लॉस्टिक पाईप,लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी भादवि 324,341,303,504,506,143,147,149 प्रमाणे आठ जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.